मिलेट्स म्हणजेच भरडधान्यांचे गुण सांगणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा समावेश असणाऱ्या ‘ऍब्युडन्स इन मिलेट्स’ या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.
हे गाणे फालू आणि गौरव शाह यांनी गायले आहे. या गाण्याच्या काही भागात मार्च महिन्यात ग्लोबल मिलेट्स (श्री अन्न) परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भाषणाचा काही अंश घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये या परिषदेचे उद्घाटन करताना त्यांनी भाषण दिले होते. ‘संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करत करत असताना भारत या मोहिमेचे नेतृत्व करत असल्याचा मला आनंद होत आहे,’ असे मोदी यांनी म्हटले होते. तसेच, शेतकरी आणि नागरिकांच्या मेहनतीच्या जोरावर ‘श्री अन्न’ ही मोहीम भारत आणि जगाच्या समृद्धतेला नवा आयाम देईल, असेही त्यांनी नमूद केले होते.
हे ही वाचा:
अवघ्या २४व्या वर्षी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू झाला निवृत्त
सूरत रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून दुसरे समन्स
मोदी यांच्या भाषणातील हा अंश फालू आणि गौरव शहा यांच्या गाण्यात समाविष्ट करण्यात आला आहे. अन्य सहा गाण्यांनाही ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. फालू शाह यांना यापूर्वी अनेकदा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यांना त्यांच्या ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या आल्बमसाठी सन २०२२मध्ये ‘बेस्ट चिल्ड्रन्स आल्बम’ या लहान मुलांच्या श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. फालू यांचा नवरा गौरव यांनी फालूसोबत आधीही अनेक गाण्यांवर एकत्र काम केले आहेत. आता दोघे ‘फोरास रोड’ या नावाने बँड चालवतात.