लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी जगात अव्वल!!

लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी जगात अव्वल!!

‘अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्ट’ या प्रतिष्ठित सर्वेक्षण आणि संशोधन करणाऱ्या फर्मच्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. कोविड महामारीच्या या कठीण काळातही मोदींची लोकप्रियता वाढली आहे असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मॉर्निंग कंसल्टच्या अप्रुव्हल सर्वेक्षणात ७५% भारतीयांनी मोदींना अप्रुव्हल दिले तर २०% लोकांनी त्यांना ‘डिसप्रूव्ह’ केले. यामुळे मोदींचे एकूण अप्रुव्हल  रेटिंग हे जगात सर्वाधिक म्हणजेच ५५% आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’ने जगभरातील १३ राष्ट्रप्रमुखांचे अप्रुव्हल रेटिंगचे सर्वेक्षण केले. यात ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे देश समाविष्ट होते. एकूण सात दिवस चाललेल्या या सर्वेक्षणात भारतातील २१२६ लोकांनी आपली मते नोंदवली होती.

या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींसोबतच मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ऍब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची लोकप्रियता वाढली आहे. जर्मनीच्या अँजेला मर्केल यांची लोकप्रियता २४% इतकी आहे तर यु.के चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या लोकप्रियतेची टक्केवारी नेगेटिव्ह आहे.

Exit mobile version