पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, ४ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये सामील झाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आशियाई देशांच्या शांतता आणि समृद्धीसाठी मुख्य व्यासपीठ राहिले आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी दहशतवादावरही निशाणा साधला. त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, सर्व देशांनी प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि सीमांचा आदर केला पाहिजे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद नरेंद्र मोदींनी भूषवले. ज्यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपण शेजाऱ्यांनाही कुटुंब म्हणून पाहतो. सुरक्षा, आर्थिक विकास, एकता आणि सार्वभौमत्व आणि पर्यावरण संरक्षण हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे आधारस्तंभ आहेत.”
हे ही वाचा:
रोममधील कोलोजियमच्या भिंतीवर नाव लिहिणाऱ्या जोडप्याची ओळख पटली
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?
इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार
भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दहशतवादाबद्दल खडेबोल सुनावले. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, “काही देश दहशतवादाचा वापर आपल्या देशाचे धोरण म्हणून करतात. दहशतवाद हा प्रादेशिक अखंडता आणि जागतिक शांततेला धोका असल्याचे ते म्हणाले. सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढण्याची गरज आहे. जे देश दहशतवादाचा आपल्या देशात धोरण म्हणून वापर करतात ते देशही दहशतवाद्यांना आश्रय देतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच अशा देशांच्या संघटनेने टीका करायला मागेपुढे पाहू नये. दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पी मापदंड स्वीकारू नये.”