भारत-बांग्लादेश ‘मैत्री सेतू’ चे मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारत-बांग्लादेश ‘मैत्री सेतू’ चे मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-बांग्लादेशला जोडणाऱ्या ‘मैत्री सेतू’ चे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी २०१५ साली आपल्या बांगलादेश भेटीदरम्यान या सेतूच्या कार्याचे उद्घाटन केले होते. आज मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सेतूचे लोकार्पण केले.

भारत आणि बांग्लादेश दरम्यान फेनी नदी वर १.९ किमी अंतराचा पूल बांधण्यात आला आहे. ‘मैत्री सेतू’ असे नाव या पुलाला देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा बांधकाम खर्च १३३ कोटी इतका आहे. या ‘मैत्री सेतू’ मुळे भारत आणि बांग्लादेश दरम्यान व्यापाराला चांगली चालना मिळणार आहे. या उद्घाटन प्रसंगी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्हिडीओ संदेश पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. “ईशान्य भारतातील राज्यांसाठी हा मैत्री सेतू म्हणजे ‘व्यापाराची लाईफलाईन’ ठरेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर “भारत आणि बांग्लादेशची मैत्री ही कनेक्टिव्हिटीमुळे आणखीन घट्ट होत आहे. बांगलादेश आणि ईशान्य भारत यांच्यात ट्रेड कॉरिडॉर विकसित होत आहे.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

‘न्यूज डंका’ आता ऍपवरही!!

या सेतूच्या उद्घटनानंतर त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतळा हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय बंदराच्या सगळ्यात जवळ असणारे भारतीय शहर ठरले आहे. या सेतूमुळे अगरतळा आणि चित्तोग्राम बंदरातले अंतर हे शंभर किमी पेक्षाही कमी झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याच्या तोंडावर या ‘मैत्री सेतू’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.

Exit mobile version