दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई एक्स्पो २०२० मध्ये इंडिया पॅव्हेलियनचे व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत संबोधन केले. दुबई एक्स्पो हा ऐतिहासिक असून मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया प्रदेशात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच एक्स्पो आहे. संयुक्त अरब अमिराती आणि दुबई यांच्याशी भारताचे सखोल आणि ऐतिहासिक संबंध वाढवण्यासाठी हा एक्स्पो महत्त्वाचा आहे.

‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताच्या पॅव्हेलियनची थीम आहे. आजचा भारत हा जगातील सर्वात खुल्या देशांपैकी एक आहे. शिकण्यासाठी खुला, गुंतवणूकीसाठी खुला असून त्याचा फायदा घेण्यासाठी भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे आमंत्रण मोदींनी दिले. गेल्या सात वर्षांमध्ये भारतात अनेक बदल झाले असून आर्थिकदृष्ट्याही भारत सक्षम आहे. भारत अमृत महोत्सवाच्या रूपात स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असल्याने, सर्वांना इंडिया पॅव्हेलियनला भेट देण्यासाठी आणि नवीन भारतातील संधींचे लाभ घेण्यासाठी मोदींनी आमंत्रित केले.

‘कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग द फ्युचर’ ही एक्सपो २०२० ची मुख्य थीम आहे. या थीमचा हेतू भारताकडून होणाऱ्या प्रयत्नांमध्ये देखील दिसतो, कारण नवीन भारत घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोदींनी संयुक्त अरब अमिराती सरकारचे एक्स्पो २०२० चे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.

 

हे ही वाचा:

एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

एअर इंडियाची घरवापसी निश्चित

मोदींनी भारत सरकार आणि भारतीयांच्या वतीने युएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख खलीफा बिन जायेद बिन अल नाहयान यांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये आणि साध्य केलेल्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. दोन्ही देशांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी असेच काम चालू ठेवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version