30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियाडायमेकिंग कलेच्या विकासासाठी नारायण राणे देणार लक्ष

डायमेकिंग कलेच्या विकासासाठी नारायण राणे देणार लक्ष

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारपेठेत डायमेकिंग व्यवसायाला महत्त्व आहे. त्यामुळे ही कला टिकणे आणि तिचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. या कलेचे सर्वेक्षण क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या योजनेअंतर्गत करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

डायमेकर उत्कर्ष संघाचे प्रतिनिधी आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नवी दिल्लीतील उद्योग भवनात भेट घेतली. त्या वेळी पालघर जिल्हा परिषद शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा तसेच डायमेकर उत्कर्ष संघाचे अध्यक्ष रमेश वझे, उपाध्यक्ष भरत बाणे, सचिव विकास मडवे, शशिकांत तामोरे यांच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेतली.

हे ही वाचा:

अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट

खबऱ्यांनी घेतला त्या आठही आरोपींचा अचूक शोध

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

गोरगरिबांसाठी केलेली मागणीही महाविकास आघाडीने फेटाळली

पालघरमधील चिंचणी, तारापूर या परिसरातील नागरिकांचे डायमेकिंग हे माध्यम उदार्निवाहाचे साधन आहे. सुमारे ५० ते ६० हजार नागरिक या सोने चांदीच्या दागिन्यांचे साचे बनवण्याच्या उद्योगातून उदरनिर्वाह करत असतात. परंतु कोरोनामुळे आलेल्या निर्बंधामुळे या उद्योगात काम करणाऱ्या नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. सुमारे २५ गावातील कारागीर, उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार्याने या ठिकाणी डायमेकिंग उद्योगाचे एक मोठे हब विकसित करण्यासाठी नारायण राणे यांनी लक्ष द्यावे असे गावित यांनी सांगितले.

उद्योगाला नवी उभारी देण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसारख्या योजना आखून त्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या कलेला आधुनिकतेची जोड दिल्यास हा उद्योग पुढील स्पर्धा आणि समस्यांना तोंड देण्यास समर्थ बनेल असे मत संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा