अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवानच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये वाद पेटण्याची चिन्हे आहेत. नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तर पेलोसी यांच्या दौऱ्यादरम्यान २१ चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.
चीनने विरोध केलेला असतानाही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्याने चीनने संताप व्यक्त केला होता. तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांनी पाऊल ठेवल्यास तैपेई विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली होती. नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या संसदेला मार्गदर्शन केले आहे.
अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैपईच्या विमानतळावर काल दाखल झाल्या होत्या. चीनचा अमेरिकेने विश्वास तोडल्याचा आरोप केला आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपलेलं नसताना आणखी एका युद्धाचं सावट निर्माण झालं आहे. चीनकडून असा दावा करण्यात येतो की, ‘वन चायना वन पॉलिसी’ अंतर्गत चीन हा तैवानला आपला भाग मानतो. त्यामुळे तैवानने कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याला चीनचा विरोध आहे. चीनने ज्या प्रकारे तणाव निर्माण केला होता त्यानुसार पेलोसी या तैवानमधून सुखरूप बाहेर पडतील का याकडे साऱ्या जगाचे लक्ष होते. मात्र, त्या आता दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत.
हे ही वाचा:
नमाजाला सुट्टी मिळते, तर बजरंगाच्या पूजेसाठी मंगळवारी सुट्टी द्या!
तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार
करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
तैवानमध्ये आल्यानंतर नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की, “तैवानचा दौरा अमेरिकेच्या लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा सन्मान करतो. आम्ही लोकशाहीचे समर्थन करतो. आपला तैवान दौरा हा जिवंत लोकशाहीचं समर्थन असून अमेरिका नेहमीच तैवानच्या मागे खंबीर उभी असल्याचा विश्वास अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी दिला आहे.”