23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरदेश दुनियारोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव

रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इटली सरकारचे आश्वासन

Google News Follow

Related

प्रसिद्ध आणि पुरातन वास्तूंच्या भिंतीवर स्वत:चे आणि प्रेयसीचे नाव कोरून या वास्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचे भारतातही अनेक ठिकाणी दिसून येते. असाच प्रकार रोममध्येही दिसून आला आहे. रोममधील प्रसिद्ध, सुमारे दोन हजार वर्षे पुरातन असलेल्या कोलोझिअम वास्तूच्या भिंतीवर ‘Ivan+Haley 23’ असे लिहिणाऱ्या पर्यटकाचा शोध आता घेतला जात आहे. इटलीच्या पर्यटन मंत्र्यांनी या पर्यटकाला शोधून त्याला शिक्षा ठोठावण्याचे वचन दिले आहे.

या पर्यटकाला कोलोझिमच्या भिंतीवर नाव कोरताना एका पर्यटकाने कॅमेऱ्यात पकडले होते. हा पर्यटक ही अक्षरे कोरत असताना रायन लुट्झ या सहकारी पर्यटकाने त्याचे चित्रिकरण केले आणि हा व्हिडीओ युट्युब आणि रेडड्डीवर पोस्ट केला. हा व्हिडीओ १५००हून अधिक जणांनी पाहिल्यावर इटलीतील प्रसारमाध्यमांचेही त्याकडे लक्ष गेले. ‘अशा महत्त्वाची स्मारकाची विटंबना होत असल्याचे पाहून मी स्तब्ध झालो,’ अशी प्रतिक्रिया लुट्झ याने दिली आहे.

 

सांस्कृतिक मंत्री गेनारो संगियुलियानो यांनीही ‘गंभीर, अप्रतिष्ठित आणि सहन करण्यापलीकडले’ अशा शब्दांत या प्रकारावर टीका केली आहे. दोषी लवकरच सापडतील आणि कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

कोलोझियमच्या भिंतीवर अशाप्रकारे अक्षरे किंवा चित्र कोरण्याची या वर्षीची ही चौथी घटना आहे. असे करणाऱ्याला १५ हजार अमेरिकी डॉलरचा दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे. पर्यटन मंत्री डॅनिएला सँटान्चे यांनीही पर्यटकांनी इटलीच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

 

तसेच, आम्ही आमच्या देशाला भेट देणार्‍यांना अशा प्रकारे मनमानीपणे वागू देऊ शकत नाही, असेही बजावले आहे.
युरोपमधून आलेला लुट्झ एकटाच सहलीवर निघाला आहे. तो कोलोझियम ही वास्तू बघण्यासाठी आला असताना त्याने त्या व्यक्तीला कोलोझियमच्या भिंतीवर उघडपणे त्याचे नाव कोरताना पाहिले. हे पाहून लुट्झला धक्का बसला. त्याने लगेचच त्या माणसाचे चित्रीकरण करण्यासाठी त्याचा फोन काढला आणि त्याला तू काय करतो आहेस, याची तुला खरोखरच जाणीव आहे का?, अशी विचारणा त्याने केली. मात्र त्यावर तो केवळ हसला. त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी, यासाठी त्याने तेथील सुरक्षारक्षक आणि पर्यवेक्षकालाही सांगितले. मात्र त्याने काहीही केले नाही. त्यांनी त्याच्याकडे व्हिडीओ मागितला. मात्र लुट्झने दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण

समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ

वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष

सन २०१४मध्ये एका रशियन पर्यटकाने ‘के’ हे मोठे अक्षर कोरल्याबद्दल त्याला २० हजार युरो म्हणजेच २५ हजार अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच, त्याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याच्या पुढच्या वर्षी दोन अमेरिकन पर्यटकांनाही भिंतीवर नावे कोरल्याबद्दल शिक्षा करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा