धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे सात आणि आठ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात नागपूर येथील रेशीम बाग मैदानावर दिव्य दरबार पार पडले. याच दरम्यान त्यांच्यावर अनिसने काही आरोप केले आहेत.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात अनिस मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्र्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना आगळंवेगळं आव्हान दिलंय. तुमच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये रोख पुरस्कार घ्या, अस आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक श्याम मानव यांनी त्यांना केलं आहे.
ठिकठिकाणी होणाऱ्या आपल्या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्यात दिव्यशक्ती असल्याचा दावा करतात. त्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून ते भाविकांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात. एखाद्या भाविकाने त्यांच्याकडे आपले नाव सांगितल्यास ते स्वतःच्या दिव्यशक्ती द्वारे त्या व्यक्तीचा पत्ता, मोबाईल नंबर आणि जीवनातील इतर अनेक महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देतात,अस धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा दावा असल्याचा अनिसचा आरोप आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यात खरोखरच दिव्यशक्ती असेल तर त्यांनी आम्ही सांगितलेल्या दहा लोकांच्या जीवनाबद्दल माहिती सांगावी. ही माहिती त्यांनी शंभर टक्के अचूक सांगण्या ऐवजी ९० टक्के अचूक सांगितली तर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती धीरेंद्र कृष्ण महाराज यांना रोख तीस लाख रुपये देईल अस श्याम मानव यांनी सांगितले आहे याशिवाय बाजूच्या रुममध्ये आम्ही दहा गोष्टी ठेवू. त्यांनी त्यांच्या दिव्यदृष्टीने त्या दहा गोष्टी ओळखाव्यात, असं त्यांना सांगितलं. मात्र, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनाही तीन लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल, असे शाम मानव यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
शाम मानव काय म्हणतात
धीरेंद्र कृष्ण महाराज जर त्या दहा लोकांसंदर्भातअचूक माहिती सांगू शकले नाहीत तर ते तीन लाख रुपये अनिसच्या खात्यात जमा होतील अशी अटही श्याम मानव यांनी घातली आहे. अनिसने यासंदर्भात नागपूर पोलिसांकडे तक्रार दिली असून जादूटोणाविरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार नागपूर पोलिसांच्या दक्षता अधिकाऱ्याने स्वतः पुढाकार घेत त्यासंदर्भात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा अशी मागणीही अनिसकडून करण्यात आली आहे. तर संघटना बंद करेल
महाराज पैशासाठी आव्हान नाही स्वीकारणार नाहीत. तर ते दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी समोर येतील. ते स्वत:ला वाघ समजतात तर त्यांनी समोर येऊन दिव्यदृष्टी असल्याचं सिद्ध करावं. त्यांनी दोनदा या गोष्टी सिद्ध केल्या तर मी त्यांच्या चरणी माथा टेकवील.
त्यांचं वय २६ वर्ष आहे. मी ७१ वर्षाचा आहे. तरीही मी त्यांच्या चरणावर माथा टेकवून त्यांची माफी मागे. आम्ही गेल्या ४० वर्षात अनेक अनेक बाबांचं ढोंग उघडं पाडलं आहे. पण बागेश्वरबाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास मी माझी संघटना बंद करेल, असं आव्हानच श्याम मानव यांनी दिलं आहे.
दरम्यान बागेश्वर बाबांनी या सगळ्यावर आज एका व्हिडिओ मध्ये म्हंटले आहे मौलवी,पाद्री यांना प्रश्न का विचारत नाहीत हिंदू असल्यामुळेच लक्ष्य करतात असं त्यांनी म्हंटले आहे