म्यानमार: ‘ऑपरेशन ब्रह्मा’मध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला

विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये उड्डाणादरम्यान दिशाभूल

म्यानमार: ‘ऑपरेशन ब्रह्मा’मध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला

भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत पोहोचवण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारतीय हवाई दलाची विमाने म्यानमारमध्ये मदत सामग्रीची ने आण करत आहेत. अशातच या मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानावर म्यानमारच्या आकाशात जीपीएस स्पूफिंग हल्ला झाल्याची माहिती ‘इंडिया टुडे’ने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या हल्ल्यात खोटे जीपीएस सिग्नल वापरून वास्तवातील समन्वय बदलण्यात आले, यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन प्रणालीला चुकीची दिशा मिळाली.

भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्मा’ मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाच्या C- 130J विमानाला GPS- स्पूफिंग हल्ल्याचा सामना करावा लागला. स्पूफिंगमुळे रिअल- टाइम कोऑर्डिनेट्स बदलले गेले, ज्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये उड्डाणादरम्यान दिशाभूल झाली. सुरक्षित नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी हवाई दलाच्या वैमानिकांनी ताबडतोब अंतर्गत नेव्हिगेशन सिस्टमवर (INS) स्विच केले, अशी माहिती आहे.

जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला असून यामध्ये बनावट सिग्नल हा वास्तविक उपग्रह डेटा ओव्हरराइड करून संबंधित सिस्टमला गोंधळात टाकतात. तसाच प्रकार हवाई दलाच्या विमानासोबत घडला. भारत- पाकिस्तान सीमेजवळ अशाच प्रकारच्या स्पूफिंगच्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत अमृतसर आणि जम्मूजवळ ४६५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात ३,६४९ लोक मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी आहे. तर, ५,००० हून अधिक लोक जखमी झाले. भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये शोध आणि बचाव (SAR), मानवतावादी मदत, आपत्ती निवारण आणि वैद्यकीय मदत यासह आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी भारताने तातडीने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले.

हे ही वाचा  : 

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!

‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’

भारताने २९ मार्च रोजी सी- १३०J विमानाचा वापर करून म्यानमारला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) साहित्याची पहिली खेप पोहचवली, ज्यामध्ये तंबू, ब्लँकेट, आवश्यक औषधे आणि अन्न यासारख्या १५ टन साहित्याचा समावेश होता. आतापर्यंत, म्यानमारमध्ये सहा विमाने आणि पाच भारतीय नौदलाच्या जहाजांनी ६२५ मेट्रिक टन एचएडीआर साहित्य पोहोचवले आहे.

...आणि मीडिया ट्रायलचा बुरखा फाटला ! | Mahesh Vichare | Dinanath Mangeshkar Hospital | Tanisha Bhise

Exit mobile version