सुवेझ कालव्यात गेले सहा दिवस अडकून पडलेले जहाज अखेरीस पुन्हा तरंगू लागले आहे. या जहाजाने जगाच्या व्यापारास शब्दशः जेरीस आणले होते. सुमारे ४०० मी. लांब आणि ५९ मी रुंद जहाज सुवेझ कालव्यात अडकल्याने दोन्ही बाजूंचा व्यापार ठप्प पडला होता. परंतु आता हे जहाज तरंगू लागल्याने व्यापार पूर्ववत सुरू होण्याच्या किमान शक्यता निर्माण झाली आहे.
एम व्ही एव्हर गिव्हन नावाचे हे जहाज सुवेझ कालव्यात अडकले होते. अत्याधुनिक यंत्र आणि टग बोट्सच्या सहाय्याने पुन्हा तरंगवण्याचे सुमारे आठवडाभर चाललेले प्रयत्न फोल ठरले होते. त्यामुळे जगातील जवळपास सर्व व्यापारी कंपन्या आणि जहाज कंपन्यांचा जीव टांगणीवर लागला होता. सुमारे २०० जहाजे या जहाजाच्या मागे अडकून पडली होती. त्यामुळे रोजच्या रोज कित्येक बिलीयन डॉलरचे आर्थिक नुकसान होत होते.
हे ही वाचा:
अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांनी छेडले ‘स्वदेशी’ सूर
लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही
पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात
आता हे जहाज पुन्हा तरंगु लागले आहे. त्यामुळे सुवेझ मधील व्यापार पुन्हा चालू होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार हे जहाज बचाव कर्मींनी वाचवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डच टगबोट आल्प गार्ड ही बोट घटनास्थळी रविवारी दाखल झाली आणि इटालियन कार्लो माग्नो जवळच पोहोचली आहे. ही बोट सुवेझ शहर बंदराच्या जवळ रविवारी पोहोचली होती.
हे जहाज जरी तरंगू लागले असले, तरीही अजूनही मार्ग पूर्णपणे खुला झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार एम व्ही एव्हर गिव्हन जरी पुन्हा तरंगू लागले असले, तरी ते प्रवास करण्यास योग्य आहे की नाही, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.