चीनमध्ये मुसलमान महिलांवर बलात्कार-बीबीसी रिपोर्ट

चीनमध्ये मुसलमान महिलांवर बलात्कार-बीबीसी रिपोर्ट

चीनमधील शिंजियांग प्रांतात मुसलमान महिलांवर बलात्कार केले जातात. शिंजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांसाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारने ‘कॅम्पस’ उभे केले आहेत. या कॅम्पसमध्ये महिलांवर बलात्कार करण्याचे धक्कादायक प्रकार घडत असल्याची माहिती बीबीसीने एका अहवालामधून दिली आहे.

या कॅम्पसमधील अनेक लोकानीं आणि एका सुरक्षा रक्षकानेदेखील अनेक वेळा बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना पहिल्या आहेत असे बीबीसीला सांगितले.

“महिला कैद्यांना रोज रात्री खेचून नेले जात असे आणि एक किंवा एक पेक्षा जास्त मास्क असलेले चिनी सैनिक त्यांच्यावर बलात्कार करत असत. यातील काही महिला कधीच परत आल्या नाहीत.” असे या पूर्व कैद्यांनी बीबीसीला सांगितले.

लाखो स्त्री-पुरुषांना चीनमध्ये अशा पद्धतीने बंदी बनवण्यात आले आहे. चीनने या तुरुंगांना ‘रीएजुकेशन कॅम्प’ असे नाव दिले आहे पण अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी या तुरुंगाची तुलना ‘नाझी काँसंट्रेशन कॅंप्स’शी केली आहे.

चीनच्या सरकारने हा अहवाल साहजिकच खोटे असल्याचे सांगितले आहे तर अमेरिकेने हा अहवाल अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे या अहवालावर आणि एकूणच उइगर मुसलमानांवर चीनकडून होणाऱ्या अत्याचारांवर मुसलमान राष्ट्रे गप्प आहेत. पाकिस्तानने देखील त्यांच्या ‘सर्वकालीन मित्र’ असलेल्या चीनच्या मुसलमानांवर सुरु असलेल्या अत्याचाराविषयी प्रश्न विचारलेले नाहीत.

Exit mobile version