भारतात मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वाधिक

भारतात मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वाधिक

अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरचे संशोधन

भारतात मुस्लिमांमध्ये प्रजननाचा दर सर्वाधिक असल्याचे एका अहवालाद्वारे समोर आले आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने भारतातील धार्मिक रचनेसंदर्भात तयार केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे.

या अहवालानुसार भारतात मुस्लिमांमध्ये प्रजनन दर सर्वाधिक म्हणजे २.६ आहे. तर त्याखालोखाल हिंदूंमध्ये २.१ हा दर आहे. २०१५पर्यंत मुस्लिमांमध्ये हा दर ४.४ असा सर्वाधिक होता. तो आता कमी झालेला असला तरी भारतात इतर धर्मियांच्या तुलनेत मुस्लिमांचा प्रजनन दर हा सर्वाधिक आहे.

जैन धर्मियांमधील प्रजनन दर हा सर्वात कमी म्हणजे १.२ इतका आहे. प्रजनन दरातील या फरकामुळे हे स्पष्ट होते की मुस्लिमांमधील प्रजनन दर हा जास्त आहे.

धार्मिक रचनेमध्ये फार मोठे बदल झालेले नाहीत. १९५१च्या जनगणनेनंतर फार मोठे बदल झाले नाहीत. २०११मध्ये जेव्हा जनगणना केली गेली तेव्हा भारतातील १.२ अब्ज लोकसंख्येत ७९.८ टक्के वाटा हा हिंदूंचा होता तर मुस्लिमांचा वाटा ९.८ टक्के होता. २००१ला मुस्लिमांची टक्केवारी १३.४ होती ती २०११पर्यंत १४.२ इतकी झाली.

हे ही वाचा:

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

परमबीर सिंग यांची लाचलुचपत विभागाकडून ‘ओपन एन्क्वायरी’

‘त्या’ निलंबित आमदारांना करता येणार राज्यसभा पोटनिवडणुकीत मतदान

भूकंपाने हादरला कांगारूंचा देश

ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन यांची मिळून टक्केवारी ६ आहे. पण यात फार मोठे बदल झालेले नाहीत.

पिऊने अहवालात नमूद केले आहे की, प्रजनन दर हा महिलांच्या शिक्षणाशी निगडित आहे. जेथे महिलांना उत्तम शिक्षण, आरोग्यव्यवस्था, नोकरीची संधी उपलब्ध असते तिथे प्रजनन दर कमी असतो.

Exit mobile version