ट्विटर या सोशल मीडियातील मंचावरून एलॉन मस्क हे सीईओ म्हणून लवकरच पायऊतार होणार आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या मस्क यांनी या पदासाठी योग्य व्यक्ती मिळाल्यावर आपण हे पद सोडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मस्क हे चर्चेत आले आहेत. मस्क हे सध्या सीईओच्या पदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहेत.
मस्क यांनी ही माहिती ट्विट करूनच दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला सीईओपदासाठी योग्य व्यक्ती मिळाल्यावर मी राजीनामा देणार आहे. त्यानंतर मी केवळ सॉफ्टवेअर आणि सर्व्हर याचीच जबाबदारी घेईन.
याआधी, मस्क यांनी जनतेचे यासंदर्भातील काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी मते मागविली होती. त्यात त्यांनी लोकांना विचारले होते की, ट्विटरचा सीईओ म्हणून मी राजीनामा दिला तर तुमचे काय मत आहे. शिवाय, या मतचाचणीत जो काही निर्णय लोक देतील तो आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटले होते. या मतचाचणीत ५७.५ टक्के लोकांनी त्यांना सीईओपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला होता.
ट्विटरची जबाबदारी घेतल्यानंतर टेल्सा या प्रमुख कंपनीचा शेअरही घसरला होता. शिवाय, ट्विटर घेतल्यामुळे त्यांच्या संपत्तीतही घट झाली होती. साहजिकच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या शर्यतीत मस्क मागे पडले आहेत.
हे ही वाचा:
पदयात्रेच्या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी जाणार का सुट्टीवर?
चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य
‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’
२० डिसेंबरला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने ट्विटरने वापरकर्त्यांच्या माहितीची कशी हाताळणी केली आहे, यासाठी आपल्या चौकशीची व्याप्ती वाढविली. त्यामुळे मस्क यांच्यापुढील संकट वाढले.
त्याआधी, ट्विटर हाती घेतल्यावर त्यांनी ट्विटरच्या ७५०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. ट्विटरचे काही जाहिरातदारही यामुळे बाहेर पडले. ट्विटरला दिवाळखोरीकडे वाटचाल करावी लागते आहे.