अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांना राष्ट्रपती पदक जाहीर केल्यानंतर त्यावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी खरपूस टीका केली असून असे पदक देणे ही थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एक्सवर मस्क यांनी म्हटले आहे की, सोरोस यांना स्वातंत्र्यपदक देण्याचा बायडेन यांचा निर्णय ही थट्टा आहे.
अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून या पदकाकडे पाहण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार १९ लोकांना घोषित झाला आहे. त्यात क्रीडा, राजकारण, मनोरंजन, मानवी हक्क, विज्ञान, समलैंगिकांची संस्था यांचा समावेश आहे. सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. लोकशाही मजबूत करणे, मानवी हक्क, शिक्षण, सामाजिक न्याय यासाठी ते काम करत असल्याचा दावा करतात.
पण मस्क यांनी सोरोस यांचा केलेला विरोध नवा नाही. २०२३मध्ये मस्क यांनी सोरोस यांच्यावर सातत्याने टीका केली होती. सोरोस यांना मानवतेचा तिटकारा असून ते समाजाची वीण उसवण्याचे काम करतात. सोरोस यांची मला मार्वलच्या मॅग्नेटशी तुलना करावीशी वाटते.
हे ही वाचा:
बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत
केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!
टाटा पंचने मारुतीला मागे टाकले
छत्तीसगडमधील अबुझमाडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा
सोरोस यांनी भारतातील मोदी सरकार उलथविण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. १९३०मध्ये ज्यू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दुसऱ्या देशातील आर्थिक घडी विस्कटणे, अरब स्प्रिंगसारख्या मोहिमांना आर्थिक पाठबळ देणे, भारतात अदानी यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांच्या मागेही सोरोसच होते.