27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियासंगीतकार वनराज भाटिया कालवश

संगीतकार वनराज भाटिया कालवश

Google News Follow

Related

चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिरातींचे जिंगल्स यासह संगीतक्षेत्रात मुशाफिरी करणारे प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रारंभी विविध प्रकारच्या जाहिरातींच्या अविस्मरणीय जिंगल्स रचून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविणारे भाटिया नंतर अंकुरपासून चित्रपट क्षेत्रात लोकप्रिय झाले. विशेषतः कलात्मक चित्रपटांत त्यांनी आपल्या संगीताचा एक वेगळा ठसा उमटविलाच पण टीव्ही मालिकाही त्यांच्या संगीतामुळे गाजल्या. निशांत, सरदारी बेगम, भूमिका, मंथन, मंडी या कलात्मक चित्रपटांच्या यशात वनराज भाटिया यांच्या संगीताचाही मोठा वाटा होता. जाने भी दो यारों, ३६ चौरंगी लेन हे त्यातलेच काही चित्रपट. तमस या प्रसिद्ध टीव्ही मालिकेच्या संगीताने तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. भारत एक खोज, वागले की दुनिया, कथासागर, खानदान, लाइफलाइन अशा प्रसिद्ध टीव्ही मालिकांचे यश वनराज भाटिया यांच्या संगीतातही होते. त्यांना देशातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

भाटिया यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चित्रपटनिर्माते हंसल मेहता यांनी भाटिया यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाटिया यांच्या निधनामुळे धक्का बसल्याचे म्हटले आहे. सिने अभिनेता फरहान अख्तर यानेही भाटिया यांना श्रद्धांजली अर्पण केली. संगीतक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतानाच तमसमधील त्यांचे संगीत विशेष लक्षात राहण्यासारखे होते, असे फरहानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होते- संजय काकडे

ठाकरे सरकारच्या घपल्याचा ‘मनोरा’ ३०० कोटींचा

केंद्राने पुरवल्या १७ कोटी मोफत लसी

मुंबईत लवकरच १४ ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु

वनराज भाटिया यांच्या आजारपणात इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटीने मदतीचा हात पुढे केला होता. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती तसेच ते आर्थिक विवंचनेतही होते. त्यामुळे त्यांना योग्य उपचारही मिळत नव्हते. त्यांना उभे राहणेही मुश्किल बनले होते. गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना मदतीचा हात दिला.

यावर्षाच्या प्रारंभी, शंकर एहसान लॉय या संगीतकारांपैकी एहसान नुरानी यांनी वनराज भाटिया यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांच्या आर्थिक विवंचनेविषयी सोशल मीडियात वाचा फोडली होती. त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे एहसान यांनी म्हटले होते. एहसान नुरानी यांनीही ट्विट करून भाटिया यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दोन वर्षांपूर्वी आमिर खानने भाटिया यांच्या जीवनावर एक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे म्हटले होते.

भाटिया यांनी भारतीय चित्रपटक्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्यानंतर त्यात आपल्या कामाची छाप पाडली. भारतात पश्चिमी शास्त्रीय संगीताचा प्रयोगही त्यांनी केला. तमससाठी १९८८मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. १९८९मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. २०१२मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा