जगात भारी “मुंबईचा वडापाव”

सर्वोत्तम सॅण्डविच मध्ये आहे १३ व्या स्थानावर ,

जगात भारी “मुंबईचा वडापाव”

लहानापासून मोठ्यांपर्यंत तर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा आवडता आणि पोटभर नाश्ता, तर कुणासाठी कधी एक वेळचे जेवण असणारा असा आपला सगळ्यांचा लाडका ‘वडापाव’ आज जगभरातून भारी ठरला आहे. वडापाव ची जरी स्ट्रीट फूड म्हणून ओळख असली तरी जगातल्या सर्वोत्तम सॅन्डविचच्या यादीत त्याचा चक्क १३ वा क्रमांक लागला आहे. मुंबई आणि वडापाव हे एक चांगले समीकरण आहे. तुमच्या खिशात भरपूर पैसे असोत नाहीतर मोजकेच तुम्ही एक वडापाव खाऊन सहज राहू शकता. वडापाव चा आस्वाद आपण कोणत्याही वेळी घेऊ शकतो. चहा बरोबर खा किंवा कॉफीबरोबर किंवा नुसताच आवड तुमची , एक खा किंवा दोन.अशाच या वडापावला जागतिक मान्यता मिळाली आहे.जगातल्या ५० सर्वोकृष्ट सॅण्डविचच्या यादीत वडापावला १३वे स्थान मिळाले आहे.

 

५० सर्वोत्कृष्ट सेंड विचच्या यादीत
मुंबईच्या वडापावला जागतिक मान्यता मिळाली असून टेस्ट ऍटलास च्या जगातील सर्वोकृष्ट सॅण्डविचच्या यादीत वडापावला मान्यता मिळाली आहे.  टेस्ट ऍटलास हि फूड ट्रॅव्हल गाईड वेब साईट असून जगभरांत पारंपरिक खाद्यपदार्थांची मार्गदर्शक माहिती यात प्रसिद्ध केली जाते यावर जगभरातल्या वेगवेगळ्या पाककृती आणि आवडीचे पदार्थ यासंदर्भात माहिती दिली जाते त्यांच्या च फूड गाईड यादीत वडापाव १३व्या स्थानावर आला आहे. याच यादीत तुर्कीचे टॉम्बिक सेंड विच पहिल्या स्थानावर , पेरू या देशाचे बुटी फारा हे दुसऱ्या स्थानावर तर अर्जेन्टिना या देशाचे डी लोमो हे सेंड विच तिसऱ्या स्थानावर आहे.

हे ही वाचा :

ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा

स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर

हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

इतिहास आणि जन्म वडापावचा
१९६६ साली दादर स्थानकाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाण्याच्या गडावरती वडापावचा जन्म झाला. त्याच वेळेस दादरमधल्या सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्यापेक्षा बेसनात घोळवून त्याचा त्यांनी वडापाव बनवला. आणि पोळीला पर्याय म्हणून पाव वापरला. शिवाय पावाबरोबर चटकदार चटण्या पण त्यांनी वापरल्या. पूर्वीपासून वडापाव हे एक गरज तर आहेच पण या प्रयोगातून तो अखंडपणे यशस्वीपणे आहे. त्यामुळे मुंबईची पण वडापाव एक परंपरा झाली आहे. नुसते वडापावची नाव घेतले तरी मुंबईकरांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.

Exit mobile version