‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईला मिळणार नवे रुपडे

G-20 परिषदे निमित्त मुंबई चकाकणार

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईला मिळणार नवे रुपडे

मुंबईचे रुप पालटण्यास सुरुवात झाली आहे. कारण मुंबईमध्ये जी-२० परिषदेची पहिली बैठक होणार आहे. त्याचे औचित्य साधून मुंबईचे रूप पालटण्यास सुरवात झाली आहे. राज्य सरकार कडून ‘मुंबई ब्रँडिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर महापालिकेतर्फे संपूर्ण मुंबई शहरात सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहीम राबावली जाणार आहे. त्याच प्रमाणे मुंबईतील रस्ते, समुद्रकिनारे, पदपथ, उद्याने, तलाव, उड्डाणपुले, शौचालये यासह सर्वच ठिकाणी डागडुजी व सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांना चकाकणारी मुंबई दिसणार आहे.

या संदर्भात मुंबई महानगर पालिकेतर्फे १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे तर ‘मुंबई ब्रँडिंग’ अंतर्गत टप्प्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच या कामाचा शुभारंभ गुरुवारी मुंबईचे प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचा नारळ फोडण्यात आला. तर कुलाबा ते माहीम या शहरा लागत असणाऱ्या ९ विभागामद्धे सुशोभित करण्यास सुरुवात झाली आहे.

तसेच मुंबईमध्ये टप्प्या टप्प्याने १२० किमी लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. सर्व उड्डाणपुलावर रोषणाई करण्यात येणार आहे. तर रस्त्यांवरील भिंतींवर भित्तीचित्रे रंगवण्यात येणार आहेत. तसेच शिवडी व माहीमच्या किल्ल्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागात १० हजार शौचालयांची डागडुजी करण्यात येणार आहे. ८ हजार कोटींच्या आराखड्यामधून, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येणारे आहेत. तसेच मुंबईमधल्या पालिकेच्या शाळेत स्किल डेव्हलपमेंट शिक्षण सुरु करण्यात येणारे आहे.

हे ही वाचा:

अयोध्येतही लवकरच धावणार इलेक्ट्रिक बस

‘महाराजा’चा रुबाब वाढतोय

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलचे सत्य आले समोर

श्रद्धा वालकरचे वडील प्रथमच आले समोर, आफताबच्या कुटुंबियांबाबत केली ही मागणी

दरम्यान, मुंबईमधील महत्वाच्या सरकारी इमारती व हेरिटेज वास्तू, उड्डाणपूल या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. तर महत्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. तर नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्यात येणार आहे. हे स्वच्छतेचे दूत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, पदपथ, रेल्वेस्थानक, बसथांबे, शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच मुंबईमधील मोकळ्या ठिकाणी साठलेल्या डिब्रिज हटवण्यात येणार आहे. अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

Exit mobile version