‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी

‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी

एरवी दरोड्यांना आळा घालण्यासाठी आणि दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी तत्पर असलेले मुंबई पोलिस दरोड्यांसंदर्भातील रोमांचक अशा ‘मनी हाइस्ट’ या लोकप्रिय वेब मालिकेच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी ३ सप्टेंबरला रीलिज झालेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या भागाच्या निमित्ताने त्यातील ‘बेला चाओ’ हे गाणे आपल्या बँडच्या सहाय्याने वाजविले आहे. त्यांनी तयार केलेल्या या गाण्याला चांगलीच लोकप्रियता लाभली आहे.

मुंबई पोलिसांनी या गाण्याच्या सरावाचा व्हीडिओ ट्विट केला आहे आणि नंतर गणवेशात हे वाजविलेले गाणेही ट्विट केले आहे. त्यालाही लोकांनी पसंती दर्शविली आहे.

‘मनी हाइस्ट’ या वेबमालिकेचा पाचवा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून त्यालाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. २०१७पासून सुरू झालेल्या या मालिकेतील पात्रे अनोख्या पद्धतीने दरोडे घालत असल्याचे दाखविले आहे. त्यातील जी पात्रे आहेत त्यांची नावेही विविध शहरांवरून ठेवण्यात आली आहेत हे विशेष. टोकियो, हेलसिंकी अशा नावाने ही पात्रे ओळखली जातात. त्यातील पाचवा भाग हा अधिक रोमांचकारी आहे.

हे ही वाचा:

जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

मुंबईतील ‘बॅंक चोर’ नायजेरियन टोळीला ग्वालियरमधून अटक

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव

प्रवाशांनो, ‘रूळ’ मोडू नका, पुलावरून जा!

खाकी स्टुडिओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या या बँडने याआधी जेम्स बाँडपटाचे प्रसिद्ध गाणे वाजविले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा हा बँड सर्वत्र लोकप्रिय झालेला आहे. पुन्हा एकदा तुमचे हृदय आम्ही चोरणार आहोत, अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी आपल्या या बँडचे छायाचित्र टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version