आशियातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई नंबर वन

बीजिंगला मागे टाकले, मुंबईत ९१ अब्जाधीश

आशियातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई नंबर वन

६०३ चौरस किमीवर पसरलेल्या मुंबईत १६ हजार चौरस किमीवर पसरलेल्या बीजिंगपेक्षा अधिक अब्जाधीश आहेत. चिनी शहराला मागे टाकून मुंबई ही पहिल्यांदाच आशिया खंडातील अब्जाधीशांची राजधानी ठरली आहे. चीनकडे ८१४ तर, भारताकडे २७१ अब्जाधीश असले तरी मुंबईत तब्बल ९२ अब्जाधीश वास्तव्य करत आहेत. तर, बीजिंगमध्ये हीच संख्या ९१ आहे. हुरून रिसर्च २०२४ ग्लोबल रिच यादीत ही माहिती उघड झाली आहे.

या नव्या यादीमुळे अब्जाधीशांच्या यादीत मुंबई जगभरात तिसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे. न्यूयॉर्कने सात वर्षानंतर पुन्हा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूयॉर्कमध्ये ११९ अब्जाधीश राहतात, तर लंडनमध्ये ९७ अब्जाधीशांचे वास्तव्य आहे. मुंबईत यंदाच्या वर्षी २६ नव्या अब्जाधीशांचा समावेश झाल्याने या शहराने बीजिंगला मागे टाकले आहे. बीजिंगच्या अब्जाधीशांच्या यादीतून १८ नावे वगळली गेल्यामुळेही हा परिणाम दिसून आला आहे.

मुंबईच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४४५ अब्ज डॉलर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ४७ टक्के वाढ झाली आहे. तर, बीजिंगच्या एकूण अब्जाधीशांची संपत्ती २६५ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदली गेली असून यात २८ टक्के घट झाली आहे. मुंबईतील सर्वाधिक संपत्तीमूल्य असणाऱ्या क्षेत्रात ऊर्जा आणि औषध कंपन्यांचा समावेश असून मुकेश अंबानी यांना सर्वाधिक लाभ झाल्याचे दिसते आहे. बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा (आणि कुटुंबीय) हे मुंबईतील सर्वांत मोठे संपत्तीवाढ होणारे उद्योजक ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’

‘मोदी मोदीचा गजर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावा’

पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल

सीबीआयकडून विझाग बंदरावर २५ हजार किलो कोकेन मिश्रित यीस्ट जप्त

असे असले तरी जागतिक श्रीमतांच्या यादीत भारतीय अब्जाधीशांच्या क्रमांकात थोडीशी घसरण झाली आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन त्यांनी त्यांचे १०वे स्थान कायम ठेवले आहे. तर, गौतम अदानी यांची आठव्या स्थानावरून १५व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. एचसीएलचे शिव नाडर यांच्या संपत्तीत आणि जागतिक क्रमवारीतही घसरण झाली आहे. ते १६व्या क्रमांकावरून ३४व्या स्थानावर घसरले आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांच्या क्रमवारीतही नऊ क्रमांकांची घसरण झाली आहे. ८२ अब्ज अमेरिकी डॉलरसह ते ५५व्या स्थानी आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप संघवी हे ६१व्या स्थानी आहेत. तर, कुमार मंगलम बिर्ला १००व्या स्थानी आहेत. डीमार्टचे राधाकृष्ण दमानी हे स्थिर उत्पन्नवाढीसह आठ क्रमांक वर जाऊन १००व्या स्थानी पोहोचले आहेत.

Exit mobile version