महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

जास्तीत जास्त भाविक घेऊ शकणार दर्शन

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवप्रेमींसाठी महाशिवरात्र हा एक मोठा उत्सवाचं असतो आपल्याकडे हिंदू धर्मात त्याला विशेष महत्व आहे. त्याच अनुषंगाने बेस्टची महाशिवरात्रीनिमित्त विशेष बस सेवा येत्या शनिवारी महाशिवरात्रीला खास भाविकांसाठी जादा    बसगाड्या ची सोयाकरण्यात आली आहे. बोरिवली येथील कान्हेरी लेणी, आणि बाबुलनाथसाठी या ज्यादा विशेष बसगाड्या चालवणार येणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ परिसरात मंदिरात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून विशेष बस सेवा सुरु करण्यात येणार आहेत. यंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यासाठी सध्या जोरदार तैयारी सुरु आहे. मुंबईतील शिवप्रेमींना, भक्तांना त्यांच्या आवडत्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील कान्हेरी लेणी  आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडे सात दरम्यान या विशेष बस सेवा चालवल्या जाणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी अशी बस सेवा असेल, तर बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत या बस सेवा असतील.

अतिरिक्त बस गाड्या वेळापत्रक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर १८८ क्रमांक या बस च्या सहा अतिरिक्त बसगाड्या साडे दहा ते साडे सात या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. तर बाबुलनाथ मंदिराकरिता वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे बस मार्ग क्रमांक ५७ वाळकेश्वर ते अँटॉप हिल आणि वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक बस मार्ग क्रमांक १०३ या मार्गावर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार आहे. याची संपुर्ण माहिती बेस्टने ट्विट करत  दिली आहे.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

माघ कृष्ण चतुर्दशी अर्थात महाशिवरात्री ला शिवदर्शनसाठी मोठी गर्दी भाविकांची होते दक्षिण मुंबईत बाबुलनाथ हे सर्वात पुरातन मंदिर आहे , हे सुप्रसिद्ध मंदिर राजा भीमदेव याने बाराव्या शतकात बांधले होते. काळाच्या ओघात ते जमीनदोस्त झाले होते पण १७८० साली त्याचे परत काही अवशेष आढळून आल्याने त्याचा परत एकदा जिर्णीद्धार करण्यात आला.

 

Exit mobile version