29 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामा‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

Google News Follow

Related

मुंबईमध्ये १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना पाकिस्तानने केवळ सरकारी संरक्षणच नाही दिले तर त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये सुविधा देत असल्याचे मत भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत व्यक्त केले. मंगळवारी झालेल्या ग्लोबल काऊंटर टेररिझ्म काऊन्सिलद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी प्रतिबंधक संमेलन २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमुर्ती यांनी हे मत व्यक्त केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता भारताने या परिषदेत बोलून दाखवली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांच्यातील दुवा ओळखला पाहिजे. समस्या कठोरपणे हाताळली पाहिजे, असे तिरुमुर्ती यांनी म्हटले आहे. “१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला पाकिस्तानने सरकारी संरक्षण दिले शिवाय त्याचा पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुणचारही करण्यात आला” असे तिरुमुर्ती म्हणाले. ‘डी- कंपनी’ आणि त्याचा प्रमुख दाऊद इब्राहीम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत तिरुमूर्ती यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानने ऑगस्ट २०२० मध्ये पहिल्यांदा दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली दिली होती. पाकिस्तानातील त्यावेळच्या सरकारनेही बंदी घातलेल्या ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांवर बंदी घातली होती. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहीमचाही समावेश होता. १९९३च्या च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहीम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनला.

हे ही वाचा:

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर टाळे’

भारतीय संघाच्या कर्णधार, उपकर्णधारासह चार खेळाडूंना कोरोनाची लागण

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

तिरुमूर्ती यांनी पुढे सांगितले की, ”आयएसआयने (ISI) दाऊद आणि त्याच्या टोळीचा वापर केला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने दाऊदच्या टोळीचा वापर करून मुंबईत दहशत निर्माण केला आणि त्या बदल्यात दाऊदला कराचीत आश्रय दिला.” १२ मार्च १९९३ हा दिवस मुंबई कधीच विसरू शकत नाही. बॉम्बस्फोटांनी शहर हादरले होते. मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा