मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

व्हिडीओ समोर येताच पाकिस्तानचा खरा चेहरा उघड

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मिळत असलेल्या व्हिआयपी सेवेचा व्हिडीओ समोर आला आहे. दहशतवादाला विरोध करत असल्याचा कांगावा करत असणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा यामुळे उघड झाला आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीउर रहमान लखवी पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. लखवी जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

भारतावर ज्याने हल्ला घडवून आणला त्या दहशतवादी झकीउर रहमान लखवी याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचे समोर आले आहे. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात भारतात एकमेव दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला होता. कसाबसह इतरांना ट्रेनिंग देणारा हा लखवीच होता. चाचू नावाने त्याला ओळखले जाते. मुंबईवरील हल्ल्याचा तपास करताना त्याचे षडयंत्र रचल्याचा आणि १० दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याचा लखवीवर आरोप आहे.

पाकिस्तानने लखवीला अटक केली होती परंतु, न्यायालयाने त्याला जामीन दिला. चार वर्षाआधी पाकिस्तानातील आणखी एका न्यायालयाने झकीउर रहमान लखवी याला टेरर फंडिंगसाठी १५ वर्षाची शिक्षा सुनावली होती परंतु, व्हायरल झालेले व्हिडीओ पाहता ही शिक्षा केवळ जगाला दिखावा म्हणून देण्यात आली होती असे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद! रवींद्र वायकरांना दिलासा

झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

भारत आणि अमेरिकेने लखवीवर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, मुंबई हल्ल्यात लखवी याचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानने बराच काळ मान्य केला नव्हता. पण, आर्थिक संकट आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमध्ये समावेश झाल्यानंतर पाकिस्तानला त्याला तुरुंगात पाठवावे लागले होते. तेव्हापासून लखवी अनेकवेळा पाकिस्तानच्या रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसला आहे.

Exit mobile version