मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित कॅनडातून ताब्यात

इंटरपोलने कॅनडामधून ताब्यात घेतले

मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित कॅनडातून ताब्यात

सन २००३ मधील मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटाप्रकरणातील प्रमुख संशयित व्यक्तीला इंटरपोलने कॅनडामधून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव सीएएम बशीर असून तो सिमीचा माजी सदस्य आहे. १३ मार्च २००३ रोजी मुलुंड रेल्वे स्थानकावर लोकल घुसत असतानाच शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यानंतर त्यात १०हून अधिक जण मारले गेले, तर ७० जण जखमी झाले.

केरळमध्ये जन्मलेला आणि एरोनॉटिकल इंजिनीअर असलेला बशीर एके काळी स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चा राष्ट्रीय अध्यक्ष होता. वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत त्याचे नाव ४३व्या क्रमांकावर होते. मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून, सीबीआयने त्याच्या नावाविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली होती. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याच्या केरळच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने जमा करण्याची परवानगी मिळवा, यासाठी मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष न्यायालयासमोर एक अर्ज दाखल केला होता. तो तिथे वेगळ्याच नावाने जगत होता, असा मुंबई पोलिसांचा दावा आहे.

केरळमधील अलुवा येथील रहिवासी असलेली त्याची बहीण सुहराबीवी इब्राहिम कुंजी हिचे नमुने घेण्यासाठी न्यायालयाने गुन्हे शाखेला परवानगी दिली. कुंजीच्या कुटुंबाचा मात्र डीएनए चाचणीला आक्षेप होता. त्यांची बाजू वकील शरीफ शेख यांनी मांडली. “कित्येक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीसाठी कुटुंबाची जबरदस्तीने डीएनए चाचणी घेण्यावर मी तीव्र आक्षेप नोंदवला होता,’ अशी माहिती शेख यांनी दिली. मात्र न्यायालयाने पोलिसांना जवळच्या सरकारी वैद्यकीय केंद्रातून किंवा अधिकृत रुग्णालयातून वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत नमुने घेण्याची परवानगी दिली.

न्यायालयाने कुंजीच्या कुटुंबीयांना तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आणि सुहारबीवी कुंजीचे रक्ताचे नमुने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. या वर्षी ६ मे रोजी तिचा भाऊ कुंजी कादरचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी न्यायालयाला दिली. बशीर ९०च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानला गेल्याचे मानले जाते. पाकिस्तानमधील आयएसआय कॅम्पमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय मुस्लिमांपैकी तो पहिला होता. अटक केलेल्या सिमीच्या सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, त्याने त्यांच्यावर दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रेरित केले. तो शारजामध्ये असला तरी तो आखाती देशात काम करणाऱ्या केरळमधील सिमीच्या माजी कॅडरच्या नियमित संपर्कात होता.

हे ही वाचा:

कुपवाडामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

शीतल कारुळकर यांना नालंदा नृत्य कला महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदाचा बहुमान

आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

कर्नाटकमधील पाठ्यपुस्तकांमध्ये आंबेडकर, नेहरू परतले

बशीर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता आणि दुबई, शारजा येथून सिंगापूर आणि आता कॅनडा येथे जात राहिला. बशीर सौदी अरेबियामध्ये दहशतवादी छावण्या चालवत होता आणि अनेक तरुण मुस्लिम तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यास जबाबदार होता, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version