उत्तर प्रदेश राज्यात खुल जा सिम सिम, पैशाचा पाऊस आला रिमझिम

रिलायन्स इंदूस्ट्रीजने केली हजारो कोटींची गुंतवणूक

उत्तर प्रदेश राज्यात खुल जा सिम सिम, पैशाचा पाऊस आला रिमझिम

mukesh ambani

उत्तर प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स शिखर परिषद मध्ये जमलेल्या देशातील सर्व प्रमुख उद्योजक योगी सरकारने आयोजित गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात रचलेल्या नवीन इतिहासाचे साक्षीदार झाले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या उदघाटन परिषदे मध्ये यामध्ये मुख्य चार उद्योजकांनी राज्यातील गुंतवणुकीबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले आणि राज्यात गुंतवणुकीसाठी निर्माण झालेल्या अनेक संधींचे या सर्व उद्योजकानी योगी सरकारचे कौतुक करून गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा सुद्धा केली आहे.

पुढील चार वर्षात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी पुढच्या चार वर्षात उत्तर प्रदेश मध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून या गुंतवणुकीतून एक लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. लखनौ येथे आयोजित समिट मध्ये मुकेश अंबानी यांनी पुढच्या पाच वर्षात उत्तर प्रदेश राज्य एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असे भाकीत केले आहे. उत्तर प्रदेश मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज दहा जी वॅट अक्षय ऊर्जा क्षमता उभारणार आहे. उत्तर प्रदेशातील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प असेल. उत्तर प्रदेश राज्यात मुकेश अंबांनी यांनी बायोगॅस प्रकल्पात उतरण्याची घोषणा केली आहे. बायोगॅसमुळे पर्यावरणाला तर चालना मिळेलच शिवाय शेतकऱ्यांना सुद्धा फायदा मिळेल.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

उत्तर प्रदेश हे नव्या भारताचे अशा स्थान झाले आहे. नोएडा ते गोरखपूर या पूर्ण भागांमध्ये आम्हाला उत्साह दिसून येत आहे. आपण सगळे मिळून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या राज्याचे भारतातील सत्वात समृद्ध असे राज्य निर्माण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  दहा ते बारा फेब्रुवारी या कालावधीत लखनौ येथे हा तीन दिवसीय समिट ग्लोबल इन्वेस्टर्स आयोजित केले आहे. हि देशातील सर्वात मोठी शिखर परिषद असल्याचा दावा यूपी सरकारने केला आहे. या शिखर परिषदेला १६ देशातील ३४० कंपन्या सहभागी झाल्या असून याला केंद्रीय मंत्री अमित शाह यांची पण उपस्थिती होती.

Exit mobile version