25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरदेश दुनियामहाराष्ट्र पर्यटन मंडळ साजरे करणार 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष'

महाराष्ट्र पर्यटन मंडळ साजरे करणार ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’

सर्व अतिथी गृहांमंध्ये मिळणार पौष्टिक पदार्थ

Google News Follow

Related

संयुक्त राष्ट्र महासंघाने २०२३ हे वर्ष ‘बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आपल्या अतिथी गृहामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा आणि वरी हे सर्व भरड धान्य वापरून भरड धान्यांचा उत्सव आयोजित केला आहे. 

त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अतिथिगृहामध्ये या भरड धान्यांचा वापर करून पदार्थ करण्याचे ठरवले आहे. पूर्वी फक्त  गरिबांचे अन्न अशी ओळख असलेल्या या धान्याचे बदलत्या काळानुरूप गहू आणि इतर धान्यांच्या मानाने आता खरी पौष्टीकता आपल्याला कळत आहे. यात आता श्रीमंत गरीब हा भेदभाव राहिला नाही आहे.

या उत्सवाचे ऑन लाईन उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबरोबर मंत्रिमंडळातील इतरही मंत्री आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सुद्धा उपस्थित होते.   

अन्न आणि कृषी महामंडळ यांनी २०२३ हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष घोषित निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यादृष्टीनेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिलेले सर्व  पदार्थ पर्यटन विकास महामंडळाच्या अतिथीगृहात आता मिळणार आहेत.  भरड धान्यापासून बनणारे स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आस्वाद आता आपण घेऊ शकता. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, पर्यटन महामंडळाच्या अतिथीगृहात ज्वारीची गरमागरम भाकरी, लसूण चटणी आणि या सगळ्या तृणधान्यापासून बनणारी वैविध्यपूर्ण खाद्य सामग्री पर्यटकांना उपलब्ध असेल आणि त्यांना ती चाखायला नक्की आवडेल. तसे निर्देशच आम्ही अतिथिगृहांना दिले आहेत.

या तृणधान्यांची एकूणच व्यापकता महाराष्ट्र राज्यांत वाढवून त्याचा प्रचार आणि प्रसार योग्य होण्यासाठी आम्ही योग्य ती पाऊले उचलत आहोत.  याच उपक्रमाअंतर्गत आम्ही राज्य, देश, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या पर्यटकांना या पोषक आणि स्वादिष्ट तृणधान्यांचे पदार्थ चाखायला देणार आहोत.  ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा आणि राजगिरा यां तृणधान्यांमध्ये लोह, कॅल्शियम, आयोडीन असे पोषक घटक असतात आणि ते ग्लूटेन मुक्त असतात, असे महामंडळाने  माहिती देताना सांगितले  आहे.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

प्रत्येक पर्यटन स्थळाच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने, महामंडळ अजिंठा पायथ्याशी, लोणार, फर्दापूर, औरंगाबाद, वेरूळ, नाशिक, सोलापूर आणि इतर प्रादेशिक कार्यालयांमध्ये हुरडा पार्ट्यांचे आयोजन करणार आहे. स्थानिक बचत गट आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून पापड, कुरड्या आणि बिस्किटे यांसारखे दर्जेदार खाद्यपदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येतील असे हि महामंडळाने सांगितले आहे . 

” जिकडे शक्य असेल तेव्हा स्थानिक, छोटे जमीनधारक शेतकऱ्यांना महामंडळ पर्यटकांच्या निवासस्थानांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक अन्नधान्यांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची योजना सुद्धा आहे,”  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा