मुंबई-पुणे प्रवासात दिसणार ‘झाडी घनदाट’

मुंबई-पुणे प्रवासात दिसणार ‘झाडी घनदाट’

‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने’ (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे ‘यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाच्या’ ७५ किमी लांबीच्या टप्प्यात झाडे लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या चालू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचाच हा एक भाग असणार आहे. त्यासाठी महामंडळाने निविदा मागवायला देखील सुरूवात केली आहे. निविदा भरण्याची अंतिम तारिख १९ मार्च निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची सहावी बैठक

आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार हे काम करणाऱ्या संस्थेला दोन टप्प्यात काम पूर्ण करावे लागणार आहे. एकूण ७५ किमी लांबीच्या रास्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम करण्यात येणार आहे. महामंडळाला या पट्ट्याचे ‘हरित पट्ट्यात’ रुपांतर करायचे आहे.

एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या माहितीनुसार, हरित धोरणांनुसार महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला देखील झाडे लावली जाणार आहेत. त्याच धर्तीवर मिसिंग लिंक प्रकल्पातही रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जातील. या कामासाठी नियुक्त केली जाणारी संस्था त्या झाडांची निगा राखण्यासाठी देखील जबाबदार असेल.

राज्य शासनाने एमएमआरडीसीला झाडे लावण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर १३ किमीने कमी होणार आहे. शिवाय अरूंद अशा खंडाळा घाटातील (भोर घाटातील) ट्रॅफिक देखील कमी होईल. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹६ हजार ६०० कोटी आहे.

Exit mobile version