भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला गोळ्या घातल्या

भारतात बंदी असलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी संघटनेशी तो संबंधित होता.

भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला गोळ्या घातल्या

ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील पंजाबी बहुल सरे शहरातील गुरू नानक शीख गुरुद्वारामध्ये कॅनडास्थित खलिस्तान समर्थक नेता आणि दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निज्जर हा सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. भारतात बंदी असलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी संघटनेशी तो संबंधित होता. ब्रॅम्प्टन सिटीमध्ये खलिस्तानी सार्वमत आयोजित करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कोण होता हरदीप सिंग निज्जर?

कॅनडास्थित निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख होता. निज्जरला यापूर्वी भारत सरकारने ‘वॉन्टेड दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते, कारण त्याचा विविध हिंसाचार आणि विध्वंसक कारवायांमध्ये सहभाग होता. भारत सरकारने जारी केलेल्या यादीत निज्जरचे नाव देखील होते, ज्यात इतर ४० निर्देशित दहशतवाद्यांची नावे आहेत.

 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यात निज्जरचा सहभाग असल्याची माहिती दिली आणि सांगितले की रॉ आणि एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहेत. आणि भारत सरकारने दोन्ही एजन्सींना मोकळा हात दिला आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी निज्जरविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये निज्जरचा सहभाग असल्याबद्दल भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते.

हे ही वाचा:

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!

उत्तरप्रदेशात उष्णतेमुळे ७२ तासांत ५४ जण दगावले

 

२०२२ मध्ये, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने फरारी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पंजाबमधील जालंधरमध्ये एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. “जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याला ठार मारण्याच्या खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) रचलेल्या कटाच्या संदर्भात हरदीपसिंग निज्जर हा राष्ट्रीय तपास संस्थेला हवा आहे” असे एनआयएने जरी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

 

एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे की, “कॅनडास्थित हरदीपसिंग निज्जर हा भारतातील शीख फॉर जस्टिसच्या अलिप्ततावादी आणि हिंसक अजेंड्याला प्रोत्साहन देत आहे. पुजाऱ्याच्या हत्येचा कट निज्जरच्या नेतृत्वाखालील खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) रचला होता”

Exit mobile version