सावधान.. देशात २४ तासांत कोरोनाचे ५००० पेक्षा जास्त रुग्ण

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार

सावधान.. देशात २४ तासांत कोरोनाचे ५००० पेक्षा जास्त रुग्ण

देशातील कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोविडचे विक्रमी ५,३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्या देखील २५,५८७ वर गेली आहे. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात ५,००० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८०टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, बुधवारी देखील कोरोनाचे ४,४३५ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक राज्यांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनावरील लसीची मागणीही वाढली आहे.

आतापर्यंत देशात २२०.६६कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस १०२.७४ कोटींपेक्षा जास्त लोकांना देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सुमारे ९५. २० कोटी दुसरा डोस देण्यात आले आहेत. त्याच वेळी २२.७२ कोटींपेक्षा जास्त लोकांना प्री-व्हॅकेशन डोस देखील मिळाला आहे.

हे ही वाचा:

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता १४ एप्रिलला

तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक

ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार , नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प मार्गी

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले जगातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५६९ नवे रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर दोन जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,८७४ वर पोहोचली आहे. मुंबई , पुणे आणि ठाण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ७११ रुग्ण आढळले. त्यातुलनेत हि संख्या कमी झालेली आहे ही दिलासा देणारी बाब आहे. बुधवारी नोंदवण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी २२१ प्रकरणे एकट्या मुंबईत नोंदवण्यात आली आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये एकूण ८० कोरोना रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी ४०ऑक्सिजनवर आहेत.

आरोग्य मंत्री बैठक घेणार
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या, शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

Exit mobile version