चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले

युनान प्रांतातील दुर्घटना

चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले

चीनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलन होऊन सुमारे ४० हून अधिक लोक गाडले गेल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चीनच्या मीडिया रिपोर्टनुसार, युनान प्रांतात सोमवार, २२ जानेवारी रोजी सुमारे १८ घरे गाडली गेली असून अनेक जण बेपत्ता आहेत. तर, २०० हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांसह विविध उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा..

पंतप्रधानांकडून मुनई मंदिरात केली प्रार्थना!

राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!

अंतराळातून राम मंदिर कसं दिसतं?, इस्रोने पाठवला फोटो!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

चीनमधील युनान हा भाग दुर्गम आहे. त्यामुळे या भागात भूस्खलन होणे सामान्य आहे. या भागाच्या जवळपास हिमालयाच्या उंच पर्वत रांगा आहेत. त्यामुळे या भागात अनेकदा भूस्खलन होत असते. सोमवारी युनानमधील डोंगरांनी वेढलेल्या याचं ग्रामीण भागात भूस्खलनाची दुर्घटना घडली. यामध्ये दुर्दैवाने ४७ लोक गाडले गेल्याची माहिती आहे. सध्या युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी ३३ अग्निशमन दलाची वाहने आणि १० लोडिंग मशीनसह २०० हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Exit mobile version