उत्तर आफ्रिकेतील लीबियामध्ये भयंकर महापूर आला असून यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लीबियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आपत्ती आहे.
दरम्यान लीबियातील पुरस्तिथीत बचाव कार्य करत असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राचे पाणी शहरात शिरल्यामुळे पाण्यात अनेक लोक वाहून गेले. यातील बहुतेकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात असले तरी त्यांचे मृतदेह शोधणे कठीण होत आहे. लीबियातील डेरना शहराला या पुराचा मोठा फटका बसला आहे.
डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनाम अल-घाइठी यांनी सांगितले की, शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर आता महामारी पसरण्याची मोठी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पाण्यात सडत आहेत. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे काही सरकारी वादामुळे लीबियामध्ये हवामान विभाग देखील कार्यरत नाही. देशात हवामान विभाग जर सक्रीय असता तर त्यांच्यावतीने काही अंदाज वर्तवले गेले असते आणि काही लोकांना वाचवता आले असते. पुराचा अंदाज वेळीच स्पष्ट झाला असता तर लोकांना आधीच कुठेतरी हलवण्यात आले असते, असे जागतिक संघटनेने म्हटले आहे. याशिवाय बचावकार्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळाला असता.
हे ही वाचा:
बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर
ड्रग्स माफिया बेबी पाटणकरने सोने देण्याच्या नावाखाली फसवले
यापुढे उद्धव ठाकरे – कोश्यारींप्रमाणे विमानावरून भांडण होणार नाही!
दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा
लीबियामध्ये भीषण पूर असून तेथील जनजीवन जबरदस्त विस्कळीत झाले आहे. दरम्यान, प्रशासनाला मृतदेह शोधण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. लीबियातील माजी सरकारमधील आरोग्य मंत्री उस्मान अब्दुल जलील यांनी देशातील परिस्थिती भयावह असल्याचे वास्तव सांगितले.