इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, अनेक परदेशी आणि भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकल्याची अमाहिती समोर आली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे इस्रायलमध्ये असलेले सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
इस्रायलमध्ये राहणारे १८ हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. यामुळे भारतीय नागरिक दिलासा व्यक्त करत असून इस्राईलमधील सर्वच भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचेही समजत आहे. सुमारे ८५ हजार भारतीय वंशाचे ज्यू इस्राईलमध्ये राहतात. सुमारे ९०० विद्यार्थी असून ते सर्व या क्षणाला इस्रायलमध्ये आहेत. तसेच आयटी व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमावर आहे.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ऍडव्हायजरी जारी केली होती. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, इस्रायलच्या स्थानिक अधिकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्लाही भारत सरकारने दिला. यासोबतच भारतीय नागरिकांनी अनावश्यक हलचाली टाळाव्यात आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला होता.
हे ही वाचा:
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापेमारी
जे.जे.रुग्णालयात १५ वर्षीय रुग्ण मुलीचा विनयभंग
इस्रायलमधून नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि….
घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते!
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेपासून इस्त्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांनी आतापर्यंत ५ हजारहून अधिक रॉकेट हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यावर प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. दरम्यान, शनिवार ते सोमवारपर्यंत गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादच्या ५०० हून अधिक ठिकाणांवर इस्राईलने हल्ले केले आहेत.