कझाकस्तानच्या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू

कझाकस्तानच्या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू

मध्य आशियातील सर्वात मोठ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंसक दंगलींच्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानमध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचादेखील समावेश आहे.
इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पश्चिम प्रांतीय भागात एक आठवड्यापूर्वी अशांतता पसरली. परंतु आर्थिक केंद्र अल्माटीसह मोठ्या शहरांमध्ये याचे जास्त पडसाद पाहायला मिळले. जिथे दंगली उसळल्या तिथे पोलिसांनी थेट गोळीबार केला. या दंगलीत कमीतकमी दोन मुलांसह १६४ लोक मारले गेले. यामध्ये कझाकस्तानमधील अल्माटी या मुख्य शहरात एकूण १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अल्माटी येथे सर्वात वाईट हिंसाचार झाला होता. आंदोलक आणि पोलीस यांच्यात भीषण चकमकी झाल्या. यामध्ये १६ सुरक्षा अधिकारी मरण पावले.

कझाकिस्तान मध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आठवड्याभरापूर्वी नागरिकांनी हिंसक आंदोलने, निदर्शने सुरू केली आणि सरकारच्या विरोधात व्यापक निषेध व्यक्त केला.तर सरकारने राजीनामा दिला. या दंगलीमुळे सुमारे १७५ दशलक्षाचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय, शंभरहून अधिक व्यवसाय, बँका उद्ध्वस्त झाल्या आहेत.

हे ही वाचा:

अंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला

शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

स्वतंत्र कझाकिस्तानच्या तीस वर्षांच्या इतिहासातील सर्वात वाईट हिंसाचारानंतर, अल्माटी आणि इतर शहरांमधील परिस्थिती आता शांत होत आहे. अन्नटंचाईच्या भीतीने बाजारसुद्धा खुले करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे आणि येत्या काही दिवसांत जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल.अल्माटीमध्ये, अधिकाऱ्यांनी जाहीर केले की सोमवारपासून काही सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. कझाकस्तानच्या माजी सुरक्षा प्रमुखाला संशयित देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच, माजी पंतप्रधान आणि कझाकस्तानचे माजी नेते नुरसुलतान नजरबायेव यांचे दीर्घकाळचे सहयोगी करीम मासिमोव्ह यांना ताब्यात घेतल्याची बातमी माजी सोव्हिएत राष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या अटकेदरम्यान आली.

Exit mobile version