गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१मध्ये ‘गृहप्रवेश’ वाढले

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१मध्ये ‘गृहप्रवेश’ वाढले

सध्याच्या घडीला एकीकडे कोरोना तर दुसरीकडे आर्थिक तंगी असे दृश्य आहे. अनेकांना नोकरी सांभाळण्याचीही कसरत करावी लागत आहे. असे वातावरण असले तरी मालमत्ता बाजारपेठ मात्र बाळसे धरू लागली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये ६,७८४ मालमत्ता नोंदणी झाली आहे.

कोरोना आणि टाळेबंदी या गोष्टी विचारात घेतल्या असता झालेल्या या मालमत्तांच्या नोंदणी हे आश्वासक चित्र दिसत आहे. ऑगस्ट २०२० च्या तुलनेत १५७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ऑगस्ट २०२१ साठी नोंदणी देखील १६ टक्के होती. देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाईट फ्रँक इंडियाच्या मते ऑगस्ट २०१९ च्या महामारीपूर्व कालावधीच्या तुलनेत जास्त आहे. तसेच त्यानंतर राज्य सरकारने ऑगस्ट २०२१ साठी मुद्रांक शुल्काचे संकलन ४०० कोटी रुपये पार केले आहे. जे २०१९ च्या मासिक सरासरीच्या जवळ आहे, तर ऑगस्ट २०२० च्या तुलनेत वर्षाच्या तुलनेत वर्षाच्या तुलनेत ४ पट अधिक आहे.

नोंदणीकृत घरांपैकी ९२ टक्के घरांची विक्री ६,२४१ इतकी होती. ही घरे ऑगस्ट २०२१ मध्ये विकली गेली आहेत. तसेच नवीन घरांची विक्री जुलैमध्ये ५३ टक्क्यांनी वाढली असून, जूनमध्ये ४२ टक्के झाली होती. एकूण नोंदणीमध्ये महिला खरेदीदारांची टक्केवारी २७१ असल्याचे नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता हे आश्वासक चित्र आता दिसून येत आहे.

हे ही वाचा:

पालिका लिपिकाच्या वाढदिवसाला जमले फेरीवाले आणि…

फोर्ब्सच्या यादीमुळे मिळाला नवा ‘आनंद’

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे गोल्डमिंटन

दुधात मिसळले जात होते अस्वच्छ पाणी आणि सुमार पावडर

एप्रिलमध्ये नव्या घरांच्या खरेदीची टक्केवारी केवळ ७ टक्के इतकी होती. सध्याच्या घडीला मुंबईत मालमत्तांची विक्री वाढत आहे. एप्रिलपासून सातत्याने विक्री ही वाढलेली दिसून येत असल्याचे संस्थेने नमूद केलेले आहे

Exit mobile version