यंदाच्या घडीला राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयांमुळे राज्यामध्ये चक्रीवादळ गुलाब आदळले. यामुळे मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये तुफान पाऊस झाला. आता हा परतीचा पाऊस लवकरच माघार घेणार असून ७ऑक्टोबरला हा पाऊस माघार घेईल असे आता म्हटले जात आहे.
३० सप्टेंबरला आता पाऊल लवकरच माघारी परतणार अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. परंतु आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही महाराष्ट्रात पाऊस सक्रीय राहणार आहे. त्यानंतरच म्हणजे दुसर्या आठवड्यात मॉन्सून माघारी फिरणार आहे. मुंबई आणि पुण्यातून मान्सून ८ ते ९ ऑक्टोबरच्या माघारी फिरण्याचा अंदाज आहे. अशी माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्याच्या दक्षिण व मध्य महाराष्ट्रात ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात परत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोबर नंतर मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचे भाकीतही हवामान खात्याने वर्तविले आहे.
हे ही वाचा:
एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही
रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धांत झाला होता हा घोळ…
काँक्रीटच्या जंगलात वाढला बिबट्याचा वावर!
कांदे भुजबळ वाद गेला उच्च न्यायालयात
जून ते सप्टेंबर हा मान्सून काळ संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीचा प्रवास उशीरा सुरू होणार आहे. पण हा पाऊस खूप पडणार नसल्याचे आता हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे. नैऋत्य मोसमी वारे आता देशातून लवकरच माघार घेणार आहे. त्यामुळे त्यानंतर ईशान्य मोसमी वारे येतील असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.