परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्यात राजस्थानातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र तसेच वायव्य भारतात पोषक वातावरण झाले असून परतीचा प्रवास लांबला आहे. अंदाजे १७ सप्टेंबर ही मान्सूला राजस्थानातून परतीची सर्वसाधारण तारीख आहे. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वायव्य भागातून परतीचा प्रवास काहीसा लांबला आहे. मात्र आता माघारीसाठी परतीच्या पोषक असे वातावरण झाले असून, परतीच्या मार्गावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगढ, दिल्ली या भागात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताची परिस्थिती पोषक असल्याने पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा निसर्गाचा लहरीपणा राहिलेला असला तरी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
पत्रकार विजय सिंह यांना पितृशोक
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब
दरम्यान यंदा सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी २९ मे रोजी पाऊस केरळ मध्ये दाखल झाला होता. मात्र महाराष्ट सर्वसाधणारण मान्सून व्यापण्यास १५ जून उजाडला. गेल्या वर्षी राजस्थामधून ६ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी भारत देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.