पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. हे दोघेही २२ जून रोजी रात्री मोदी यांच्यासाठी रात्रीच्या भोजनाचे यजमानपद भूषवतील. तर, दुसऱ्यांदा ते काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील.
अमेरिकेमधील न्यूजर्सी स्थित रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थाळी दाखल केली असून त्या थाळीचे नाव ‘मोदीजी की थाली’ असे ठेवले आहे. भारतीय अमेरिकी सदस्य मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहेत. ‘भारताला आधी विकसनशील देश म्हणून ओळखले जात होते. मात्र १० वर्षांत खूप काही बदल झाला आहे. मोदीजींचे खूप खूप आभार,’ असे एक व्यक्ती व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
तर, वॉशिंग्टनमध्ये राहणारे काश्मिरी हिंदू मोहन यांनी काश्मीरमधून ३७० आणि ३५ ए कलम हटवल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. ‘पंतप्रधान मोदी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधन करतील. याचाच अर्थ पंतप्रधान मोदी यांनी भू-राजनैतिक विश्वावर प्रभाव टाकला आहे,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकास्थित महिलेने दिली आहे.
हे ही वाचा:
मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न
भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले
शरद पवार धमकी प्रकरणी एका इंजिनिअरला अटक
मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी
भारतीय- अमेरिकींचा उत्साह शिगेला
अमेरिकी ओव्हरसीज फ्रेंड्सच्या भाजप अध्यक्षांनी सांगितले की, भारतीय अमेरिकी नागरिकांमध्ये उत्साह आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत-अमेरिका संबंध चांगल्या स्थितीत आले आहेत. पंतप्रधान मोदी येथे २० जून रोजी पोहोचत आहेत, मात्र १८ जून रोजी भारतीय अमेरिकी नागरिक अणेरिकेतील २० शहरांमध्ये ‘स्वागत मोदी एकता दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.