अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी २२ जून रोजी संयुक्त सत्राला संबोधित करतील. त्यांची ही दुसरी वेळ असेल. संयुक्त सत्राला दुसऱ्यांदा संबोधित करणारे ते भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्राला अन्य देशाच्या अध्यक्षांनी संबोधित करणे हे सन्मानाचे मानले जाते. हा सन्मान मिळाल्याने मोदी यांनी अमेरिकी संसदेचे आभार मानले आहेत.
‘या स्नेहपूर्ण आमंत्रणासाठी धन्यवाद. माझा हा सन्मान केल्याबद्दल आभार. पुन्हा एकदा संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याची मी वाट पाहात आहे. आम्हाला अमेरिकेसोबत असणाऱ्या आमच्या वैश्विक राजनैतिक भागिदारीवर अभिमान आहे. ही भागिदारी लोकशाहीची मूल्ये, व्यक्तींव्यक्तींमध्ये असणारे दृढ संबंध आणि वैश्विक शांती व समृद्धीच्या कटिबद्धतेच्या पायावर रचली गेली आहे,’ असे ट्वीट करत मोदी यांनी आभार मानले आहेत.
हे ही वाचा:
वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी
पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा
बिहारमधील पडलेल्या पुलाची जबाबदारी असलेली सिंगला कंपनी निशाण्यावर
पंतप्रधानांचे भाषण ऐतिहासिक
अमेरिकी संसदेला दुसऱ्यांदा संबोधित करण्यासाठी जाणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांना हा सन्मान मिळाला आहे. नेतान्याहू यांनी तीनवेळा अमेरिकी संसदेला संबोधित केले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाचे संसद सदस्य रो खन्ना यांनी हाऊसचे अध्यक्ष केविन मॅकर्थी यांना पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकी काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानंतर मोदी यांन आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले आणि ३ जून रोजी हे आमंत्रण पाठवण्यात आले.