‘पूर्वी आपण कबूतरे सोडत असू आता चित्ते सोडत आहोत’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्रीय रसद पुरवठा धोरण जाहीर

‘पूर्वी आपण कबूतरे सोडत असू आता चित्ते सोडत आहोत’

एक काळ असा होता की आपण कबूतर सोडत होतो आता चित्ते सोडत आहोत, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रसद पुरवठा धोरणाची घोषणा करताना बदलत्या काळाचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी आफ्रिकेतील नामिबियातून भारतात आलेले ८ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडले. पाच मादी आणि तीन नर असे हे ८ चित्ते आहेत.

संध्याकाळी पंतप्रधानांनी राष्ट्रीय रसद पुरवठा धोरणाची घोषणा केली. या प्रकल्पाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, राष्ट्रीय रसद पुरवठा धोरण आणि जंगलात चित्ते सोडण्याची घटना यात काहीतरी संबंध आहे. कारण हा रसद पुरवठा चित्त्याच्या वेगाने व्हावा अशी अपेक्षा आहे. युनिफाइड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म्स याच्या माध्यमातून निर्यात करणे अधिक सुरळीत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचे अनावरण केले.या वेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की, विकसित भारत घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते पुढे म्हणाले की, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी हा भारतातील लॉजिस्टिक इकोसिस्टमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक व्यापक प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीने सर्व क्षेत्रांसाठी नवी ऊर्जा आणली आहे.

हे ही वाचा:

१०० कोटीचा बंगला, पिक्चर अभी बाकी है…

अशा दहा गोष्टी ज्यामुळे मोदींचे अप्रुप वाटते…

देशभरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी कार्यक्रमांची रेलचेल

मेहुण्याच्या हत्येसाठी त्याने चक्क विकली मालकाची मोटार

 

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सर्वत्र मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताची प्रतिध्वनी आहे. भारत केवळ निर्यातीचे मोठे लक्ष्यच ठेवत नाही, तर ते पूर्णही करत आहे. याशिवाय भारत एक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे.

आज भारतीय बंदराच्या एकूण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे आणि कंटेनर जहाजाचा सरासरी वळण वेळ 44 तासांवरून 26 तासांवर आला आहे. जलमार्गाच्या माध्यमातून आपण पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात वाहतूक करू शकतो, त्यासाठी देशात अनेक नवीन जलमार्गही बांधले जात आहेत. लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि पद्धतशीर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आम्ही सागरमाला, भारतमाला सारख्या योजना सुरू केल्या आहेत. एवढेच नाही तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामालाही अभूतपूर्व गती मिळाली आहे.

Exit mobile version