पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) १८ व्या आसियान-भारत शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. पूर्व आशिया शिखर परिषद हे इंडो-पॅसिफिकमधील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखालील मंच आहे. २००५ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, पूर्व आशियाच्या धोरणात्मक आणि राजकीय विकासात याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
१० आसियान सदस्य देशांव्यतिरिक्त, पूर्व आशिया शिखर परिषदेत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश आहे. असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारत, पूर्व आशिया शिखर परिषदेचा संस्थापक सदस्य असल्याने, पूर्व आशिया शिखर परिषदेला बळकट करण्यासाठी आणि समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
१८ व्या ASEAN-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आसियान-भारत धोरणात्मक भागीदारीच्या स्थितीचा आढावा घेतील. ब्रुनेईच्या सुलतानाच्या निमंत्रणावरून ते या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.
कोविड-१९, आरोग्य, व्यापार, दळणवळण, शिक्षण आणि संस्कृती या प्रमुख क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचा पंतप्रधान आढावा घेतील. महामारीनंतरच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा केली जाईल.
ASEAN-भारत शिखर परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. ही परिषद भारत आणि ASEAN यांना सर्वोच्च स्तरावर सहभागी होण्याची संधी प्रदान करते.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या १७व्या आसियान-भारत शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. या वर्षीची ही शिखर परिषद नववी आसियान-भारत शिखर परिषद असेल ज्यात ते सहभागी होणार आहेत.
आसियान-भारत धोरणात्मक भागीदारी ही भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या मजबूत पायावर उभी आहे. आसियान हे आमच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो-पॅसिफिकच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाचे केंद्रस्थान आहे. २०२२ हे वर्ष आसियान-भारत संबंधांना ३० वर्षे पूर्ण करणार आहे.
हे ही वाचा:
आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर
अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
भारत आणि आसियानमध्ये अनेक संवाद यंत्रणा आहेत ज्या नियमितपणे संवाद साधतात. ज्यात शिखर परिषद, मंत्रीस्तरीय बैठका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचा समावेश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये आसियान-भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली होती.