मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

फ्रान्सच्या सर्वोच्च अशा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. असा सन्मान होणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. याआधी जगभरातील नेते व प्रतिष्ठित व्यक्तींना याआधी या सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री पॅरिस येथील एलिसी पॅलेस येथे झालेल्या सोहळ्यात फ्रान्सच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजन प्रसंगानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदी यांनी या अद्वितीय सन्मानाबद्दल सर्व भारतीयांकडून मॅक्रॉन यांचे आभार मानले आहेत. याआधी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, जर्मनीच्या माजी अध्यक्ष एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्राच्या महासचिव बुट्रोस बुट्रोस-घाली यांना मिळाला आहे.

जूनमध्ये मोदी यांना रशियातील ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, सन २०२१मध्ये भूतानचा ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’, सन २०२०मध्ये यूएईचा ‘ऑर्डर ऑफ द जाएद’ आणि सन २०१६मध्ये सौदी अरेबियाचा ‘सऊद अब्दुलअजीज अल’ हा पुरस्कार मिळाला होता.

हे ही वाचा:

…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!

विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार

आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल

बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार; जाहीर झाले बेलआऊट पॅकेज

‘आज संध्याकाळी एलिसी पॅलेसमध्ये माझे स्वागत केल्याबद्दल मी राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आणि श्रीमती मॅक्रॉन यांचे आभार मानतो,’ असे ट्वीट मोदी यांनी केले आहे. तर, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ‘हा पुरस्कार म्हणजे भारत आणि फ्रान्सच्या नात्याच्या भावनेचे प्रतीक आहे,’ असे म्हटले आहे.

Exit mobile version