मोदींनीही घेतली कोविडची लस

मोदींनीही घेतली कोविडची लस

देशभरात कोविड-१९ वरील कोविशिल्ड या लसीेची लसीकरण मोहिम जोरात चालू आहे. दिनांक १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात आज सकाळी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. यानंतर याबाबत त्यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी “एम्समध्ये कोविड-१९च्या लसीची पहिली मात्रा घेतली. आपल्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी कोविड-१९ विरूद्धच्या जागतिक लढ्याला बळ देण्यासाठी झपाट्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. मी सर्व पात्र नागरिकांना आवाहन करतो की लस घ्यावी. सर्वांनी एकत्र मिळून भारताला कोविड-१९ मुक्त बनवूया.”

नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन भारतीय बनावटीच्या, भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सीन लसीची पहिली मात्रा आज घेतली. यानंतर त्यांनी जे लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यांना लस घेण्याचे आवाहन देखील केले. आजपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसोबतच ४५ ते ५९ वयोगटातील अजून काही आजार असणाऱ्या व्यक्तींना देखील लस दिली जाणार आहे. जे नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत ते कोविन या ऍपवर नोंदणी करू शकतात, किंवा नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर खासगी रुग्णालयांत एका मात्रेसाठी ₹२५० दर निश्चित करण्यात आला आहे. आपली नाव नोंदणी करण्यासाठी आरोग्यसेतू सारख्या इतर ऍपचा देखील वापर करता येणार आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण, मुख्यमंत्री निरुत्तर, फडणवीसांनी दिले उत्तर

Exit mobile version