मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला असून, सरकारने आठ युट्युब चॅनेल ब्लॉक केली आहेत. यामध्ये पाकिस्तानी चॅनेलचाही समावेश आहे. ब्लॉक केलेली ही चॅनेल्स भारताविरोधात बनावट आणि चुकीची माहिती पसरवत होते.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठ युट्युब चॅनेल ब्लॉक केली आहेत. यामध्ये सात भारतीय चॅनेल आणि एक पाकिस्तानी चॅनेलचा समावेश आहे. आयटी नियम, २०२१ अंतर्गत सात भारतीय आणि एक पाकिस्तान आधारित युट्युब न्यूज चॅनेल होते. ही युट्युब चॅनेल भारताविरोधात माहिती युट्युब चॅनेलवर टाकत होते. भारताला बदनाम करणाऱ्या या युट्युब चॅनेलला ११४ कोटी लोकांनी पाहिली आहेत. तर या युट्युब चॅनलचे ८५ लाख ७३ हजार सब्सक्राइबर्स होते.
.@MIB_India blocks 8 YouTube channels, 1 Facebook Account & 2 FB posts for spreading disinformation related to India’s national security, foreign relations & public order
The YT channels were used to post fake news on the Indian Armed Forces, J&K, etc.
🔗https://t.co/FHeROCOBrb pic.twitter.com/PtLET2Ghuh
— PIB India (@PIB_India) August 18, 2022
याशिवाय युट्युब चॅनेल, मंत्रालयाने १६ ऑगस्ट रोजी एक फेसबुक खाते आणि दोन फेसबुक पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेशही जारी केले. मंत्रालयाने ब्लॉक केलेला मजकूर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्याची सुरक्षा, परकीय राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध यासाठी हानिकारक असल्याचे आढळून आले, अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे.
हे ही वाचा:
हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ
भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक
संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?
पुढील आठ चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत:
- लोकतंत्र टीव्ही १२.९० लाख सदस्य
- U&V टीव्ही १०.२० लाख सदस्य
- ए.एम.रझवी ९५ हजार ९०० सदस्य
- गौरवशाली पवन मिथिलांचल ७ लाख ग्राहक
- SeeTop5TH ३३.५० लाख सदस्य
- सरकारी अपडेट ८० हजार ९०० सदस्य
- सब कुछ देखो १९.४० लाख सदस्य
- न्यूज की दुनिया (पाकिस्तानी चॅनेल) ९७ हजार सदस्य