अफगाणिस्तानात आता तालिबानने राज्य हस्तगत केले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केले. त्यामुळे तिथे अराजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेस विविध देशांनी आपल्या नागरीकांना तेथून सोडवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर रणनिती बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश होता. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही या बैठकीत उपस्थित होते.
भारताने देखील अफगाणिस्तानच्या आरजकातून आपल्या नागरीकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी एक विमान अफगाणिस्तानात देखील दाखल झाले आणि या विमानातून अनेक नागरिकांना सुरक्षित जामनगर येथे आणण्यात आले.
मात्र काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे ऑपरेशन एअर लिफ्ट यशस्वी झाले असून, अफगाणिस्तानातील सर्व भारतीय नागरीक सुरक्षितरित्या भारतात दाखल झाले आहेत.
हे ही वाचा:
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
त्याबरोबरच अफगाणिस्तानातील इतर हिंदुंना देखील वाचवण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. इतर देशामार्फत अफगाणिस्तानात गेलेल्या भारतीय नागरीकांना देखील वाचवण्यासाठी भारत प्रयत्न करणार असल्याचे समजले आहे. अशा प्रकारच्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समजले आहे. त्यासाठी एनएसए अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत पंतप्रधानांच्या बैठका देखील सुरू असल्याचे समजले आहे.