मोदी-बायडन भेटीची तारीख निश्चित…

मोदी-बायडन भेटीची तारीख निश्चित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिली ‘व्हर्च्युअल’ भेट शुक्रवारी होणार आहे. दोन्ही नेते क्वाडच्या बैठकीत भेटणार आहेत. जो बायडन यांनी जानेवारीमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. कोविड-१९ च्या काळात ‘व्हर्च्युअल’ भेटी घेऊनच समाधान मानावे लागणार आहे.

क्वाडमध्ये चार देशांचा समावेश आहे. भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे देश यामध्ये समाविष्ट आहेत. क्वाडची स्थापना २००७ मध्ये तत्कालीन जपानी पंतप्रधान शिंझो आबे यांनी केली होती. क्वाड म्हणजेच क्वाड्रीलॅटरल सेक्युरिटी डायलॉग हा आशियातील नेटो म्हणून सुद्धा ओळखला जातो. परंतु तूर्तास या चार देशांमध्ये कोणताही सुरक्षा करार करण्यात आलेला नाही. क्वाड हे चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी स्थापन झालेले एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, अशा प्रकारची कोणतीही घोषणा अधिकृतपणे क्वाडच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चारही देशांना चीनच्या वाढत्या सामरिक आणि आंतरराष्ट्रीय प्रभावाचा धोका जाणवतो. त्यामुळे हे चार देश परस्परांचे हितसंबंध जोपासण्याच्या उद्देशाने एकत्र आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

चीनी कुरापतींवर जपानी चिंता

भारत आणि अमेरिका संबंध हे गेली दोन दशके आणि विशेष करून गेली ५-७ वर्षे सातत्याने बळकट होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ओबामा यांचे संबंध ज्या पद्धतीने चांगले होते तसेच मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांचेही होते. आता जो बायडन आणि मोदी यांचे संबंधदेखील दोन्ही देशांचे हितसंबंध लक्षात घेता चांगलेच असतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु या दोन नेत्यांमधील ही पहिलीच अधिकृत भेट असल्याने या भेटीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version