मोदी म्हणाले, भारतातील ‘बायडन’चे पुरावे मी सोबत आणले आहेत!

मोदी म्हणाले, भारतातील ‘बायडन’चे पुरावे मी सोबत आणले आहेत!

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट झाली आणि गंभीर मुद्द्यांवर चर्चा होण्यापूर्वी सुरुवात झाली ती खुसखुशीत संवादाने.

बायडन यांनी त्या संवादाची सुरुवात केली आणि हा सगळा संवाद नंतर हास्यरंगात बुडाला. बायडन म्हणाले की, मी जेव्हा १९७२मध्ये २८ वर्षांचा असताना सिनेटर म्हणून निवडून आलो तेव्हा शपथग्रहण करण्याआधी मला मुंबईतील बायडन नावाच्या एका माणसाचे पत्र आले. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत मला कळले की, भारतात बायडन नावाची पाच माणसे आहेत. त्यावर पंतप्रधान मोदी हसले. मग बायडन म्हणाले की, मी त्यावेळी विनोदाने म्हणालो की, इस्ट इंडियन टी कंपनी (चहाची कंपनी) येथे एक कॅप्टन जॉर्ज बायडन म्हणून होता याची मला माहिती मिळाली आहे. तो कॅप्टन भारतात राहिला आणि तिथे भारतीय महिलेशी विवाहबद्ध झाला. पण मी त्याचा शोध घेऊ शकलेलो नाही. त्यामुळे या भेटीचा (मोदी-बायडन) उद्देश या व्यक्तीचा शोध घेणे हाच आहे.

बायडन यांच्या या वक्तव्यानंतर मोदी यांनी त्यावर कुरघोडी करत म्हटले की, आपण पूर्वजांचा शोध घेणारी काही कागदपत्रे सोबत आणली आहेत. मी तशा कागदपत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकेल. त्यावर हशा पिकला आणि बायडनही म्हणाले की, आता मला थोडा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

गडकरी म्हणाले, येत्या ३-४ महिन्यांत इथेनॉलची इंजिन सक्तीचे

नितीन गडकरी यांनी केले महाराष्ट्रातील २२ महामार्गांचे भूमिपूजन

मोदी पुढे असेही म्हणाले की, विनोदाचा भाग सोडला तर जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांतील संबंध दृढ, बळकट होत आहेत.

बायडन म्हणाले की,  जगातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी अमेरिका-भारत संबंध उपयुक्त आहेत. मी २००६मध्ये म्हटले होते की, २०२०पर्यंत भारत आणि अमेरिका हे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले असतील.

Exit mobile version