सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

लोकसंख्येवर लगाम घालण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना मिझोराममधील मिझो नॅशनल फ्रंटचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी चक्क लोकसंख्या वाढीसाठी बक्षिसे द्यायला सुरुवात केली आहे.

आर.आर.आर. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉबर्ट यांनी सर्वाधिक मुले असलेल्या १७ कुटुंबांना २.५ लाखांचे वाटप केले आहे. ऐझवाल पूर्व भागात त्यांनी हा कार्यक्रम घेतला होता. मिझोरामच्या चर्चेस आणि इतर नागरी संस्थांनी लोकसंख्या वाढीसाठी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.

जूनमध्ये फादर्स डेच्या निमित्त सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना त्यांनी १ लाखांच्या इनामाची घोषणा केली होती. छोट्याशा मिझोराम राज्यात लोकसंख्या वाढावी यासाठी रॉबर्ट यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. एनगुरुवी या महिलेला त्यांनी १ लाख आणि मानचिन्ह असे बक्षीस दिले. या विधवा महिलेला १५ मुले आहेत. त्यात ७ मुलगे आहेत.

रॉयटे यांनी म्हटले आहे की, मिझोराममधील कमी लोकसंख्या लक्षात घेता हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. घटत असलेली लोकसंख्या ही या राज्याची समस्या आहे.

जनगणनेनुसार २०११मध्ये मिझोरामची लोकसंख्या १०.९७ लाख होती. २००१च्या जनगणनेशी तुलना केली तेव्हा त्यात २३.४८ टक्के वाढ झाल्याचे दिसले आहे. १९७१-८१मध्ये मिझोराममधील लोकसंख्येने झेप घेतली होती. त्यावर्षात मिझोराममध्ये ४८.५५ टक्के वाढ झाली होती.

हे ही वाचा:

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

अभिनेत्री नोरा फतेह आली ईडी कार्यालयात; जॅकलिनलाही समन्स

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

जळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

 

मिझोरामचे हे क्रीडामंत्री म्हणाले की, मिझोराममधील लोकांच्या विकासाचा विचार करता लोकसंख्या वाढणे आवश्यक आहे. इथे दोन मुलांची अट चालू शकत नाही. प्रत्येक किलोमीटरमागे ५२ व्यक्ती असे प्रमाण आहे ते निदान ९४ व्हायला हवे.

Exit mobile version