…म्हणून मिराबाईने केला १५० ट्रक चालकांचा सत्कार

…म्हणून मिराबाईने केला १५० ट्रक चालकांचा सत्कार

वेटलिफ्टर मिराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते दुसऱ्याच दिवशी उघडल्यावर तिचे देशभरात कौतुक झाले. पण तिला आपल्या या यशाचे श्रेय आणखी कुणाला तरी द्यायचे होते. जे पडद्यामागील तिचे पाठिराखे होते.

इम्फाळ, मणिपूर येथे आपल्या सरावासाठी तिला रोज आपल्या गावातून जावे लागे. त्यासाठी तिला अनेकवेळा ट्रकने प्रवास करावा लागत असे. हे अंतर जवळपास ३० किलोमीटर इतके होते. म्हणूनच तिला सरावासाठी रोज एवढे अंतर कापून घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांचा सत्कार करण्याचे तिने ठरविले.

सरावासाठी अकादमीत जाण्यासाठी तिला रोजचा खासगी वाहनाने प्रवास करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे मग इम्फाळला जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून ती हे अंतर रोज कापत असे. या ट्रक चालकांचे आभार कसे मानावे असा विचार तिच्या मनात आला होता. म्हणूनच तिने १५० ट्रक चालकांचा सत्कार करण्याचे ठरविले. त्यांना जेवू घातले आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या. एक शर्ट आणि मणिपुरी स्कार्फ अशी तिची अमूल्य भेट होती. तिने या चालकांसह साधलेला संवाद आणि त्याची छायाचित्रे लगेचच व्हायरल झाली.

मिराबाईचा भाऊ सैखोम सनातोम्बा मैतेई म्हणतो की, तिचे सरावाचे केंद्र २०-३० किमी लांब आहे. आमचे आईवडील तिला रोज १०-२० रुपये देत असत. पण एवढ्या प्रवासात हे अंतर कापणे शक्य नव्हते. त्याच मार्गाने जाणारे अनेक ट्रक मार्केटमधून निघत. त्या ट्रकमधून तिला तिथे पाठवत असू. तिनेही कधी याबद्दल तक्रार केली नाही.

हे ही वाचा:

शर्लिन चोप्राच्या जबाबातून आता पोलखोल होणार

या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

भाजपा नेते, रा.स्व.संघ नेत्यांनंतर आता धोनीचा नंबर

अनिल देशमुख प्रकरणात कोण धमकावत आहे सीबीआयला?

मिराबाईने ४९ किलो गटात ऑलिम्पिक रौप्य जिंकत इतिहास रचला. असे पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय वेटलिफ्टर ठरली. याआधी कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Exit mobile version