31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियामिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत 'उचलले सोने'

मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’

Google News Follow

Related

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मिराबाई चानूने सुवर्णपदक पटकाविले. भारताचे हे या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आहे. मिराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये एकूण २०१ किलो वजन उचलले. त्यात स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन तिने पेलले. त्यामुळे चानूने वैयक्तिक विक्रम तर केलाच पण राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमाचीही नोंद केली.

‘मिरा तुम हो इंडिया का हिरा’ असे बॅनर त्यावेळी स्टेडियममध्ये झळकत होते. मिराबाईने या स्पर्धेत आपला वरचष्मा राखला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला चीनच्या स्पर्धकाकडून पराभव सहन करावा लागला होता आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता स्थिती पूर्णपणे बदलली.

हे ही वाचा:

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

सीसीटीव्हीमुळे पकडले गेले दोन सराईत मोबाईल चोर

 

यावेळी ४९ किलो वजनी गटात मिराबाई चानूवर साऱ्यांच्या अपेक्षा होत्या. तिने राष्ट्रकुल स्पर्धेआधी, तिने या स्पर्धेतील रौप्यविजेत्या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा २५ किलो जास्त वजन उचलले होते. त्यामुळे तशाच कामगिरीची तिच्याकडून अपेक्षा होती. तिने त्या अपेक्षा पूर्ण केल्याच पण रौप्यविजेत्या खेळाडूपेक्षा २९ किलो अधिक वजन उचलले. त्यामुळे अर्थातच सुवर्णपदकावर तिला स्वतःचे नाव कोरता आले. गळ्यात सुवर्णपदक घातल्यानंतर राष्ट्रगीत वाजू लागले आणि स्टेडियममधील तमाम भारतीय चाहत्यांच्या माना उंचावल्या. पदक स्वीकारताना मिराबाईच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हसू प्रकर्षाने दिसत होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मास्क घातलेल्या मिराबाईला बर्मिंगहॅममध्ये मात्र मास्क नसल्याने मनसोक्त हसता आले.

तिच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. मिराबाईने भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुन्हा एकदा केली आहे, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. तिच्या या सोनेरी कामगिरीमुळे भारतीयांना प्रेरणा मिळेल विशेषतः युवा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळेल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

बिंदियारानीला रौप्य

भारताच्या बिंदियारानी देवीनेही आपली चमकदार कामगिरी दाखवत भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. बिंदियारानीनं क्लीन अँड जर्कमध्ये शेवटच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलून कांस्यपदकावरून थेट रौप्यपदकावर झेप घेतली आणि भारताच्या खात्यात चौथे पदक जोडले. २३ वर्षीय बिंदियारानीने महिलांच्या ५५ किलो गटात एकूण २०२ किलो वजनासह रौप्य पदक जिंकून देशाला चौथे यश मिळवून दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा