24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाबांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

२०२२ मध्ये बांगलादेशात इस्लामिक अतिरेकी हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली.

Google News Follow

Related

२०१९ च्या डिसेंबर महिन्यात, मोदी सरकारतर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी जनतेत ह्या कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आले. २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातर्फे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन धार्मिक अल्पसंख्याकांसाठी भारतीय नागरिकत्व मिळणे सोयीस्कर जावे म्हणून १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली गेली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची खरी गरज बांगलादेश दौऱ्यादरम्यान तिथल्या हिंदूंशी बोलताना प्रकर्षाने जाणवली.

 

दोन दिवसांपूर्वीच (२ जून २०२३) ढाका येथे निवडणुकांदरम्यान होणाऱ्या अल्पसंख्यांक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेने रॅली काढली होती. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाने २०१८ च्या निवडणुकांपूर्वी अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक आश्वासने दिली, ज्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करणे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली होती, परंतु पुढची राष्ट्रीय निवडणूक जवळ आलेली असताना देखील ह्या आश्वासनांची पूर्तता करण्यात शेख हसीना यांचे सरकार अपयशी ठरले आहे.

 

ऑक्टोबर २०२१ दरम्यान बांगलादेशमधील आग्नेय भागातील कुमिल्ला जिल्ह्यातील एका फेसबुक पोस्टने हिंदू दुर्गा पूजा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लिमांसाठी पवित्र पुस्तक कुराणची विटंबना केल्याची अफवा पसरली आणि संपूर्ण बांगलादेशात हिंदुविरोधी हिंसाचार सुरू झाला. एका स्थानिक वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ह्या अफवेनंतर १०० हून अधिक हिंदू मंदिरे, उत्सव स्थळे, दुकाने आणि घरांवर हल्ले करण्यात आले. सात लोक ठार झाले आणि एका बौद्ध मठालाही आग लावण्यात आली. ढाकेश्वरी मंदिरात भेटलेल्या एका बांगलादेशी हिंदू महिलेच्या म्हणण्यानुसार, “अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर करून अल्पसंख्यकांविरुद्ध मुद्दाम इस्लाम निंदेच्या कथित अफवा पसरवून हल्ल्याचे प्रमाण वाढले असून एकंदरीतच हसीना सरकार देखील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीकडे कानाडोळा करत आहे.” बांगलादेशातील हिंदू नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “१९४७ मध्ये असलेली हिंदूंची संख्या ३०% वरून आता ९% पेक्षाही कमी झाली आहे.

 

मागच्याचवर्षी म्हणजे २०२२ मध्ये, ३५००० हुन अधिक हिंदू कुटुंबांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून इस्लामवाद्यांनी बेदखल करण्याची धमकी दिली होती.  २०२२ मध्ये बांगलादेशात इस्लामिक अतिरेकी हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी बांगलादेशात ३१९ हिंदू घरे जाळण्यात आली. शिवाय १५० पेक्षा अधिक महिलांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. हा आकडा आपल्याला छोटा वाटत असला तरीही बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या लक्षात घेता नक्कीच धक्कादायक आहे. २०२२ मध्येच बांगलादेशातील विविध राज्यांमध्ये ४८१ हिंदू मंदिरांवर हल्ला झाला त्याचबरोबर ३१९ मंदिरांच्या जागांवर अवैधरित्या इस्लामिक धर्मांधांनी कब्जा केला.

 

ढाका विद्यापीठात शिकणाऱ्या इस्लामिक संघटनेशी संबंधित विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांना मी, “बांगलादेश तर धर्मनिरपेक्ष (अर्थात Secular) आहे मग तरीही अल्पसंख्यांकांवर अत्याचार का होतात?” असे विचारले असता त्याने उत्तर दिले की, “आम्ही बांगलादेश धर्मनिरपेक्ष आहे असे आम्ही मानत नाही. हिंदुस्थान हिंदूंचा देश आहे तसाच बांगलादेश मुस्लिमांचा देश आहे.”  मी भारतात बांगलादेशापेक्षा अधिक मुस्लिम राहतात असे सांगितल्यावर त्यांचे बोलणे निवळले. तिथे उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्या मुलांच्या मताला विरोध देखील केला. बांगलादेशातील बहुमूल जनता मुस्लिम असली तरीही आपल्या बांगला संस्कृतीबद्दल प्रचंड जागरूक आहे. ढाक्यात फिरताना आणि बांगलादेशातील गावांमध्ये देखील आजही मुली सुंदर जामदानी साड्या नेसलेल्या दिसतात. अनेकींच्या कपाळावर मुस्लिम असूनही टिकली असते. चैत्रातील नववर्ष हा बांगलादेशी लोकांसाठी मोठा उत्सव असतो. भारतात देखील हिंदू नववर्ष चैत्रात साजरे करतात हे त्यांना सांगितल्यावर आश्चर्य वाटले.

 

सतीची आभूषणं ढाक्याच्या धर्तीवर पडली तेव्हा ढाकेश्वरी देवीने अवतार घेतला. ढाका शहराचे नाव देखील याच देवीमुळे ठेवले गेले. १९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने ढाकेश्वरी मंदिरातील पुरातन मुर्तीचा भंग केला. पुढे बांगलादेश सरकारने मंदिराचे पुनरावलोकन केले परंतु, मंदिराची मोठी जागा ‘प्रॉपर्टी ऍक्ट’ अंमलबजावणीत  बांगलादेश  सरकारकडून जप्त करण्यात आली.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचे राजकारण थुकरट वळणावर

राजीनामा मागणाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी सुनावले; ही मदत करण्याची वेळ राजकारणाची नव्हे!

दरवाजे सताड उघडे ठेवा पंकजाताई येणार नाहीत

साहिल नशा करणारा, गुंडांच्या टोळीशी संबंध

ढाका विद्यापीठ परिसरातील १६ व्या शतकात गुरु नानक साहेब राहिला आलेल्या गुरुद्वाराला भेट देण्याचा ही योग ह्या दौऱ्यादरम्यान आला. ह्या घटनेला अनुसरून गुरुद्वाराचे नाव गुरु नानक शाही असे ठेवण्यात आले. पुढे गुरु तेग बहादूरांनी देखील काही काळ येथे वास्तव्य केले इथे गुरु तेगबहादूरांच्या पवित्र पादुका आणि त्यांनी स्वतः काढलेल्या स्वतःच्या चित्राची एक आवृत्ती उपलब्ध आहे. अनेक भारतीय शिखांना देखील माहिती नसलेले हे पवित्र स्थळ १६ व्या शतकात बांधण्यात आले परंतु पुढे भारतीय एम्बेसीने त्याच्या देखभालीसाठी हातभार लावला. ढाका परिसरात स्थानिक शीख नसल्याची खंत तिथल्या ग्रंथींनी (शिखांचे पुजारी) व्यक्त केली. मी आवर्जून भेट दिली म्हणून कौतुकही केले.

 

ढाका शहरात धार्मिक तेढ कमी जाणवत असली तरी बांगलादेशातील अल्पसंख्याक जनतेशी संवाद साधताना मात्र शहरी झगमगाटापासून लांब असलेल्या दूरस्थ गावांमध्ये होणाऱ्या अत्याचारांबद्दल ऐकून भारताने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज प्रकर्षाने जाणवते. ढाका शहरात धार्मिक तेढ कमी जाणवत असली तरी बांगलादेशातील अल्पसंख्याक जनतेशी संवाद साधताना मात्र शहरी झगमगाटापासून लांब असलेल्या दूरस्थ गावांमध्ये होणाऱ्या अत्याचारांबद्दल ऐकून भारताने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे महत्व अतिशय जाणवते.

(वरील जनतेशी घडलेला संवाद हा प्रासंगिक असल्यामुळे कुठेही नावे न छापण्याच्या अटीवर घडला आहे. म्हणून लेखात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळले आहे.)

लेखिका जेएनयू,दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधात पीचडी करत असून काही दिवसांपूर्वीच अभ्यासानिमित्त केलेल्या बांगलादेश दौऱ्यावरून परतल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा